शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बसची विनामूल्य सोय - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते साय 6 मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेकामी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांच्यासाठी एस. टी. बसेसची सोय विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, निवडणूक प्रक्रियेकामी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांच्यासाठी दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 5.00 वाजता कर्मचारी कार्यरत असलेल्या तालुका मुख्यालयांच्या ठिकाणांपासून बस निघणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यास निवडणूक कामकाजाकरिता नेमून देण्यात आलेल्या विधानसभा मतदार संघाच्या वितरण केंद्राच्या ठिकाणापर्यंत ही बस घेऊन जाईल. तसेच दि. 23 एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर रात्री निवडणुकीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघाच्या साहित्य स्वीकृती केंद्रापासून कर्मचारी कार्यरत असलेल्या मुख्यालयांच्या ठिकाणी परत घेऊन जाईल. याची सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
वाहतुकीचे नियोजन पुढीलप्रमाणे - दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजता कार्यरत विधानसभा मतदारसंघातून एस. टी. सुटण्याचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे - 281- मिरज - छत्रपती शिवाजी स्टेडियम, हिरा हॉटेल चौक मिरज, 282 - सांगली - मध्यवर्ती बस स्थानक सांगली, 283 इस्लामपूर - एस. टी. स्टॅन्ड इस्लामपूर, 284 - शिराळा - एस. टी. बसस्थानक शिराळा, 285 पलूस - नवीन एस. टी. स्टॅन्ड, पलूस, 285 कडेगाव - एस. टी. स्टॅन्ड, कडेगाव, 286 खानापूर - एस. टी. स्टॅन्ड विटा, 286 आटपाडी - एस. टी. स्टॅन्ड आटपाडी, 287 तासगाव - तहसिल कार्यालय समोरील क्रीडा मैदान, तासगाव, 287 कवठेमहांकाळ - एस. एम. हायस्कूल कवठेमहांकाळ, 288 जत - श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल ज्यु. कॉलेज (एसआरव्हीएम) ता. जत.
दि. 23 एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर कार्यरत विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी परत जाण्यासाठी एस. टी. सुटण्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे -  281 - मिरज - शासकीय धान्य गोदाम, वैरण बाजार, मिरज, 282 - सांगली - तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली, 283 इस्लामपूर - शासकीय धान्य गोदाम, पोलीस परेड ग्राऊंडजवळ, इस्लामपूर, 284 - शिराळा - शासकीय औद्योेगिक प्रशिक्षण संस्था शिराळा, 285 पलूस - तहसिल कार्यालय कडेगाव कडेगाव तडसर रोड, 285 कडेगाव - तहसिल कार्यालय कडेगाव कडेगाव तडसर रोड, 286 खानापूर - शासकीय धान्य गोदाम, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर, विटा, 286 आटपाडी - शासकीय धान्य गोदाम, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर, विटा, 287 तासगाव - तहसिल कार्यालय, तासगाव, 287 कवठेमहांकाळ - तहसिल कार्यालय तासगाव, 288 जत - श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल ज्यु. कॉलेज (एसआरव्हीएम) ता. जत.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा