शनिवार, २० एप्रिल, २०१९

प्रचार कार्यातील मतदारसंघाबाहेरील व्यक्तींनी प्रचार कालावधी समाप्तीनंतर जिल्ह्यात थांबू नये - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्याबाहेरील व्यक्ती किंवा जिल्ह्यातील मतदार नाहीत अशा व्यक्ती त्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत किंवा प्रचार कार्यात कार्यरत होत्या अशा व्यक्तींना दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये थांबता येणार नाही. अशा बाहेरील व्यक्तींनी मुदतीपूर्वी जिल्ह्याबाहेर जाणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
लोक प्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 126 अन्वये मतदान समाप्त होण्यासाठी निश्चित केलेली वेळ समाप्त होण्याच्या कालावधीपूर्वी 48 तासांच्या कालावधीत प्रचारकार्य बंद करण्याबाबतच्या तरतुदी विषद करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदीनुसार निवडणुकीतील प्रचार कार्य दरम्यान, राजकीय पक्ष प्रचार कार्यास मदत करण्याच्या दृष्टीने, मतदान असलेल्या मतदार संघाबाहेरील समर्थकांना संघटीत करतात. प्रचार कालावधी संपल्यानंतर, मतदार संघात कोणताही प्रचार करता येणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता, मतदारसंघाच्या बाहेरून आणण्यात आले आहे आणि जे मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय पदाधिकारी / पक्ष कार्यकर्ते मिरवणुकीतील कार्याधिकारी / प्रचार मोहिमेतील कार्याधिकारी इत्यादींना मतदारसंघात नियमितपणे उपस्थित राहू देऊ नये, कारण प्रचार कार्य संपल्यानंतर, त्यांच्या उपस्थितीमुळे मुक्त निष्पक्ष वातावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे.
 त्यामुळे आयोगाने निर्देश दिले आहेत की, प्रचारकार्याचा कालावधी संपल्यानंतर, जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी प्रचारमोहिमेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तात्काळ, अशा सर्व बाहेरील कार्याधिकाऱ्यांनी मतदारसंघ सोडल्याची खातरजमा करावी. त्याचे अनुपालन करणे त्यांना शक्य व्हावे या दृष्टीने हे अनुदेश सर्व राजकीय पक्ष, उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणण्यात यावे.
वरील अनुदेशांची अंमलबजावणी केली जात आहे याची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीने, जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत पुढील उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना निगर्मित करण्यात आलेल्या आहेत. (1) अशा व्यक्तींची जेथे राहण्याची सोय केली आहे असे कल्याण मंडप / समाज मंदिर इत्यादींची तपासणी करणे आणि बाहेरील व्यक्तींची राहण्याची सोय करण्यात आली आहे किंवा कसे याचा शोध घेणे. (2) राहणाऱ्या व्यक्तींची यादी तपासण्यासाठी निवासगृहे अतिथीगृहे यांची पडताळणी करणे (3) मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी-नाके उभारणे मतदारसंघाबाहेरून येणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची तपासणी करणे (4) लोक / लोकांचा समूह हे मतदार आहेत किंवा नाही हे, शोधून काढण्याच्या दृष्टीने, त्याच्या ओळखेची पडताळणी करणे ओळख सिध्द करणे. या आदेशाचे सर्व संबंधित राजकीय पक्ष उमेदवार यांनी पालन करून विहीत मुदतीनंतर अशा बाहेरील व्यक्ती प्रचार कार्यात सामील असणार नाहीत त्या जिल्हा / मतदारसंघाबाहेर जातील, याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा