सोमवार, ८ एप्रिल, २०१९

मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : सार्वत्रिक लोकसभा निडणूक 2019 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 27 मार्च 2019 अन्वये दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदान होणार असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली. 
    ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा