शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४
शहरी भागातील एक लाखाहून अधिक महिला लाभार्थी - मनपा आयुक्त शुभम गुप्ता
सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू करण्यात आली. या योजनेचे 14 ऑगस्ट पासून पात्र महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले. शहरी भागातील सुमारे 1 लाख 25 हजाराहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केला असून त्यापैकी 75 हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट 3 हजार रुपये जमा झाले असून उर्वरित 50 हजार महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील, अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील. या कामी माहिलांनी सहकार्य करावे. अतिशय कमी कालावधीमध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.
स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात. स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रती महिना दीड हजार रुपये मानधनाची मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृष्यप्रणालीव्दारे मिरज बालगंधर्व नाट्यमंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार या सर्वांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. हे शासन सर्वसामान्यांचे असून ते शेवटच्या घटकांपर्यंत कार्यरत राहणार आहे. स्त्रियांनी बँकेतून पैसे काढण्याची घाई करू नये. या पैशाचा विनियोग कुटुंबीयांसाठी तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करावा, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेली दोन महिने प्रशासन अव्याहतपणे प्रयत्न करीत आहे. दि. 14 ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून यामध्ये बँकर्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात 10 महिलांना धनादेश व रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे चार लाख 59 हजार इतके अर्ज आले असून त्यापैकी सुमारे चार लाख 45 हजार अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच या कामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक लाभार्थ्यांना पैसे वर्ग केल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी अश्विनी संकपाळ व वैष्णवी राजपूत या पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास नीता केळकर, स्वाती शिंदे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४
पुणे येथे होणाऱ्या लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व महानगरपालिकेने समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे पुणे येथील बालेवाडी मैदानावर आज शनिवार 17 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपण होणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय वाघ, महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) सुहास बुधवले, सर्वसाधारण तहसीलदार लीना खरात यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000
समाधानाचे चांदणे पसरते तेव्हा ... !
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साही व आनंदी वातावरणात साजरा होत होता. सकाळच्या त्या रम्य व प्रसन्न वातावरणात अचानक ऐन वेळेला आनंदाच्या श्रावणसरी बरसल्या . . . ! त्याचे झाले असे की, पत्रकार नगरमध्ये राहणाऱ्या श्रीमती सोनाली कांबळे वय 35 यांच्या बँक ऑफ इंडिया (शाखा सांगली) खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सुमारे 3 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल ) आला अन् एकाच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद . . कौतुक . .आश्चर्य . .आणि समाधानाचे एक वेगळेच चांदणे पसरले.
रक्षाबंधन हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे, परंतु रक्षाबंधन अगोदरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनस्वी आनंद झाला. या योजनेच्या अनुषंगाने बोलताना श्रीमती कांबळे म्हणाल्या, या योजनेमुळे मला माझ्या हक्काचे पैसे मिळाले रक्षाबंधनापूर्वीच हे पैसे मिळतील याची खात्री नव्हती परंतु तत्पूर्वीच ते मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या रूपाने मला एक कर्तुत्वान भाऊ मिळाल्याचे समाधान आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद . – लाभार्थी सोनाली कांबळे
00000
मिरज येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आज महिला मेळाव्याचे आयोजन
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज महिला लाभार्थ्यांसाठी मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण राज्यभर दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपण होणार आहे.
त्या अनुषंगाने बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आज शनिवार रोजी सकाळी 11 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
समाधानाचे चांदणे पसरते ते
शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४
धरणातून विसर्ग वाढविल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यतानागरिकांनी सतर्क रहावे, घाबरून जावू नये- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा सांगलीदि. 2 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्याकरीता दि.2 ऑगस्ट पासून पुढील 5 दिवसाकरीता ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. परंतु सातारा जिल्ह्याकरीतादि. 2 व 3 ऑगस्ट रोजीसाठी रेड अलर्ट आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी 5 च्यास्थितीनुसार वारणा धरणात 29.61 (86 टक्के) तर कोयना धरणात 86.78 (82 टक्के) टी.एम.सी.पाणीसाठा आहे. कोयना धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून 10 हजार क्युसेक्स विसर्गवाढविल्यामुळे आता एकूण 52 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 11 हजार 532 क्युसेक्सविसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणात 55 टक्के पाणीसाठा असून 3 लाख क्युसेक्स विसर्गसुरू आहे. पर्जन्यमान, धरणातून विसर्ग यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यताआहे. प्रशासन व सर्व यंत्रणा सतर्क असून नागरिकांनीही सतर्क रहावे, घाबरून जावूनये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना मिळताचस्थलांतर करावे, प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारीडॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारीडॉ. राजा दयानिधी म्हणाले, अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे 116 गावे बाधित झाली आहेत.8556.05 हे.आर इतके पिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशदिले आहेत. राज्य मार्ग 5, प्रमख जिल्हा मार्ग 21 व ग्रामीण मार्ग 11 पाण्याखाली गेलेआहेत. 1 ऑगस्ट अखेर एकूण 1 हजार 173कुटुंबातील 5 हजार 145 स्त्री, पुरूष व लहान मुले स्थलांतरीत झाली आहेत. आपत्तीचामुकाबला करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. एक एन.डी.आर.एफ. पथक (30 जवान) दि.15 जून पासून व एक सैन्य दल पथक (107 जवान) दि. 26 जुलै पासून जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यांच्या वतीने ठिकठिकाणीरंगीत तालीम घेण्यात आली आहे. संभाव्य वाढणाऱ्या पाण्याच्यापातळीबाबत सर्व पूर प्रवण तालुके व महानगरपालिका क्षेत्र यांना सतर्क राहण्यासाठीसूचना देण्यात आल्या आहेत. पाणी पातळी वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळनागरिक व जनावरांचे स्थलांतर करण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना देण्यात आलेल्याआहेत. पाण्याखाली गेलेले रस्ते व पूल या ठिकाणी बॅरिकेट करून रस्ते बंद करण्यात आलेआहेत. वीज पुरवठा खंडीत झालेल्या ठिकाणी पूराचे पाणी ओसरल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी महत्वाचे पूल, रस्ते या ठिकाणीपूराचे पाणी पाहण्याकरीता गर्दी होते त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तठेवण्यात आला असून प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आले आहेत. जीवाला धोका पोहचेलअसे कृत्य करू नये, असे कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराहीजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे.00000
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगाला प्रेरणादायी - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : केवळ दीड दिवसाच्या शाळेत शिकलेले परंतु आपल्या अलौकिक प्रतिभेने सरस्वतीची सेवा करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे साहित्य हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या मूळ गावी वाटेगाव येथे 104 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, वाटेगावच्या सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे तसेच नातू सचिन साठे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपली लेखणी ही समाजातील उपेक्षित वंचितांच्या तसेच कामगारांच्या प्रश्नांसाठी वापरली. त्यांनी संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. तसेच वाटेगाव च्या विकासासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने वाटेगाव येथे आदर्श शैक्षणिक संकुल उभा राहावे यासाठी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची साहित्य निर्मिती ही वेदनेच्या आधारावर उभी होती. अण्णा भाऊ साठेंनी त्यांनी आपल्या लेखनाद्वारे शोषित समाजातील दैन्य, दुःख, दारिद्र्य यांचे वास्तव मांडले तसेच शाहीरीद्वारे (पोवाडा ) तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये समता आणि बंधुतेचा विचार घेऊन समाजाला पुढे जाता येईल असा विचार मांडला.
प्रारंभी बार्टीचे व्यवस्थापक सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टीद्वारे सुमारे दहा कोटी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे फित कापून उद्घाटन केले. याप्रसंगी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, सम्राट महाडीक, सत्यजित देशमुख, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष श्रीमती नंदिनी आवाडे, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
०००००
बुधवार, ३१ जुलै, २०२४
. . .तिथे कर माझे जुळती !
सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्ह्यात काही तालुक्यातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. सुदैवाने सध्या सांगलीकरांची पूरस्थिती टळली असली तरीही भारतीय सेनादलाची तुकडी डोळ्यात तेल घालत कार्यरत आहे. ज्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सुमारे 100 जणांची भारतीय सैन्य दलाची तुकडी बोलावली होती ती तुकडी आपल्या कर्तव्यापासून तसभूरही मागे हटले नाही अथवा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली नाही.
त्याचे झाले असे की , सांगलीतील मगरमच्छ कॉलनीतील रहिवाशांना पुराच्या पाण्यामुळे बाहेर जाता की आत येता येत नव्हते. अशा आव्हानात्मक स्थितीत सैन्यदलाच्या तुकडीतील काही सैनिकांनी त्यांना जेवणाचे तसेच जेवण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची पाकिटे वितरित केली तसेच सैन्यदलाच्या वैद्यकीय चमुने त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची काळजी घेत त्यांच्या आरोग्य विषयक बाबींची तपासणी केली. भारतीय सैन्यदलाच्या या निरपेक्ष कृतीने बाधित नागरिकांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद पसरला. भारतीय सैनिक हे केवळ सीमेचेच रक्षण करतात असे नाही तर मानवीय भाव -भावनांच्या सीमेचेही रक्षण त्यांनी केले यात शंका नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की , . . . तेथे कर माझे जुळती !
00000
जिल्ह्यात मंगळवारी सरासरी 15.9 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्ह्यात मंगळवार, दि. 30 जुलै रोजी सरासरी 15.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 53.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 30 जुलै रोजी पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.6 (437.7), जत 1 (273.5), खानापूर-विटा 6.7 (354.2), वाळवा-इस्लामपूर 30.2 (705.9), तासगाव 8.4 (432), शिराळा 53.5 (1104.9), आटपाडी 1.5 (254.1), कवठेमहांकाळ 5.9 (384.2), पलूस 18.4 (489.6), कडेगाव 16.8 (476.3).
वारणा धरणात 29.25 टी.एम.सी. पाणीसाठा
कोयना धरणातून 42 हजार 100 तर वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग
सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.25 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 3 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 85.59 (105.25), धोम 11.38 (13.50), कन्हेर 8.06 (10.10), वारणा 29.25 (34.40), दूधगंगा 21.95 (25.40), राधानगरी 8.36 (8.36), तुळशी 3.28 (3.47), कासारी 2.26 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.43 (4.08), उरमोडी 7.71 (9.97), तारळी 5.04 (5.85), अलमट्टी 67.67 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी (आज सकाळी 8 वाजेपर्यंत) व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 37.7 (40) व अंकली पूल हरिपूर 43.9 (45.11).
00000
मंगळवार, ३० जुलै, २०२४
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आवाहन
सांगली दि. 30 (जि.मा.का.) : सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 1 त 2 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 38फूट 6 इंच इतकी आहे. आज कोयना धरणामधून 42 हजार 100, धोम धरणातून 453, कन्हेर धरणातून 4 हजार 622, उरमोडी धरणातून 500, तारळी धरणातून 3 हजार 526 व वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
00000
शुक्रवार, २६ जुलै, २०२४
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्याणतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आज सुट्टी
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने व जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणची पाणी पातळी 38.07 फुट झाल्याने कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कायलीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्ती अधिकारान्वरये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यासतील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्तर व्यरवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्यार आस्थापपनेवरील शैक्षणिक संस्थे,तील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तथापी या कालावधीत सर्व मुख्यााध्याैपक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्थायनिक प्रशासनाच्याक आदेशानुसार आपत्तीक व्येवस्थालपनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
00000
गुरुवार, २५ जुलै, २०२४
पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, सेल्फी काढण्यास मनाई
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयर्विन पुलावरुन तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावांमध्ये काही तरुण मुले व नागरीक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 27 ठिकाणी व त्यापासुन 100 मिटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिनांक 26 जुलै 2024 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे.
संबंधित ठिकाणांच्या 100 मीटर परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण जमण्यास फिरण्यास, वावरण्यास, उभा राहण्यास, पाणी पाहण्यासाठी जाण्यास तसेच फोटो सेशन करण्यास, व्हिडीओ ग्राफी करण्यास, रील्स बनविण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे.
मनाई करण्यात आलेली पोलीस ठाणे हद्दितील ठिकाणे पुढीलप्रमाणे - सांगली शहर - आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट. सांगली ग्रामीण - हरिपूर – नदीघाट, कसबेडिग्रज – कृष्णा नदी पूल, कवठेपिरान – सातसय्यद दर्गा, माळवाडी – कुंभोज पूल, दुधगाव – खोची पूल. मिरज ग्रामीण - म्हैशाळ बंधारा. महात्मा गांधी चौक - कृष्णा घाट ते अर्जुनवाड पूल, कृष्णा घाट. मिरज शहर - म्हैशाळ रोड वांडरे कॉर्नर. आष्टा - शिरगाव बंधारा, शिगांव पूल, वाळवा (हाळभाग) ते कारंदवाडी रस्ता. इस्लामपूर - बहे पूल, ताकारी पूल. शिराळा - सागांव वारणा नदी पूल. कोकरूड - चरण पूल, आरळा पूल कोकरूड पूल. भिलवडी - भिलवडी पूल, औदुंबर मंदिर, आमणापूर पूल, नागठाणे बंधारा, सुखवाडी ते तुंग नवीन पूल. विटा - कमळापूर ते रामापूर जाणारा पूल.
हा आदेश दि. 26 जुलै 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
00000
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आज सुट्टी
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सांगली जिल्हयात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्त अधिकारान्वये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापने वरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तथापी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
00000
पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष
नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे
- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. सन 2019 व सन 2021 मधील पुराचा अनुभव पाहता, जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी सतर्क रहावे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करताना जनतेने घाबरु नये. प्रशासनाशी संपर्कात रहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
पूर परिस्थिती उदभवल्यास आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल त्याकामी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. नदीपात्रापासून १०० मीटर परिसरामध्ये नागरिकांनी जाऊ नये फोटो, सेल्फी काढू नये. नदीपात्रावरील पूलावरून पाणी वाहत असल्यास अशा पुलावरून वाहने नेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामूळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामूळे नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये या दृष्टीने भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सूरू असल्याने जिल्ह्यातील मिरज (सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपलिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकिय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत.
00000
पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
पालकमंत्र्यांनी सांगली व मिरज येथे केली पूर परिस्थितीची पाहणी
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यास कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. शासन, प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आयर्विन पूल सांगली व कृष्णाघाट मिरज येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते व अन्य समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या, यावर त्यांनी त्यांच्या या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
000000
आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सध्या सांगली जिल्ह्यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपापसामध्ये समन्वय ठेवून आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी. या कामी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिला.
आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी चाऱ्यांची व्यवस्था करावी. निवारा केंद्रात स्थलांतरित लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच त्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा देण्यात याव्यात. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपले फोन 24 तास सुरू ठेवावेत तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आपत्तीच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घ्यावे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये तसेच आपत्ती कालावधीत रजा घेऊ नये. प्रत्येक अधिकारी फिल्डवर पाहिजे अशा सूचना करून जिल्ह्यातील ताकारी, टेंभू-म्हैसाळ या योजनेतून सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तालुक्यांना पाणी सोडावे, असे निर्देश ही त्यांनी या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच एसटी विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील बंद रस्त्याबाबत माहिती घ्यावी. त्याचबरोबर बाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये मुख्याध्यापकांची सेवा घेण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेषत: गरोदर स्त्रियांची योग्य काळजी घ्यावी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने, नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. आरोग्य विभागाने आपत्कालीन स्थितीत आरोग्य विषयक सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी असे निर्देश दिले. तर पूर बाधीत ग्रामीण भागांमध्ये निवारा केंद्राची आवश्यकतेनुसार उभारणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी दिली. त्याचबरोबर सांगली मनपाकडून आपत्कालीन परिस्थितीच्या निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी दिली.
प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती प्रास्ताविकामध्ये दिली. या बैठकीसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसह इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
00000
शुक्रवार, १९ जुलै, २०२४
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - सहायक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी योजनेच्या निकषानुसार व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
योजनेचे निकष - अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहायता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गट नोंदणीकृत असावा.
प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे - स्वयंसहायता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती इ.). स्वयंसहायता बचत गटाच्या नांवे असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स व या खातेशी अध्यक्ष व सचिव यांचे आधारलिंक असलेचा पुरावा. स्वयंसहायता बचत गटाचा ठराव व सभासद यादी. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे दाखले. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले रहिवाशी पुरावे. (डोमेसाईल). स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे आधारकार्ड झेरॉक्स. 100 रू स्टँम्पवर ट्रॅक्टर खरेदीबाबतचे हमीपत्र. सर्व कागदपत्रे ही साक्षांकीत केलेली असावीत.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता इच्छुक बचत गटांनी दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहीतीसाठी समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
सर्व धर्मियांमधील 60 वर्षावरील नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यास मान्यता दिली आहे.
देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु, गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची / दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.
या योजनेतून प्रति व्यक्ती 30 हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. भारतातील 73 व राज्यातील 66 निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता योजनेतून एकवेळ लाभ घेता येईल. या योजनेतून पात्र प्रवाशांची निवड ही पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येईल.
योजनेतून निवड होण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. अर्ज करताना आधारकार्ड, रेशनकार्ड, अधिवासबाबत पुरावा, उत्पन्न दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, योजनेच्या अटी पालन करणावावत हमीपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील. योजनेचे अर्ज स्विकारण्याकामी शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांची पुर्तता आपल्या स्तरावर करावी व पोर्टल सुरू होताच अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. - एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर व रोटरी क्लच अध्यक्ष मनिष मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून सुरूवात होवून विश्रामबाग चौक- सांगली मार्केट यार्ड -पुष्कराज चौक - मार्गे सिव्हील हॉस्पीटल येथे सांगता झाली. या स्पर्धेकरीता जिल्ह्यातील कार्यरत 9 रेड रिबन क्लब कार्यान्वीत असणाऱ्या महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेचे नियोजन हे सांगली जिल्हा ॲम्युचुअर ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्यालने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सांगली कार्यालयाकडून करण्यात आले.
रेड रन मॅरेथॉन स्पर्धेकरीता आदर्श कॉलेज विटा, आर. आर. पाटील कॉलेज सावळज, म्हैशाळ कॉलेज म्हैशाळ यांचे प्राध्यापक वर्ग तसेच गुलाबराव पाटील कॉलेज मिरज, यशवंतराव चव्हाण कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर, डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज, बळवंत कॉलेज विटा सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, आयसीटीसी, गुप्तरोग विभाग, एआरटी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.
रेड रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बाबासो अनिल कुडलापघोळ (डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज), व्दितीय क्रमांक अनिकेत कुडलापघोळ (डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज), तृतीय क्रमांक हर्षवर्धन कृष्णात पाटील (कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर) यांनी पटकावला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा भारत सोनवणे (बळवंत कॉलेज विटा), व्दितीय क्रमांक उषा तुकाराम चव्हाण (मा. आर.आर. पाटील कॉलेज सावळज), तृतीय क्रमाक प्रतिक्षा भारत सोनवणे (आदर्श कॉलेज विटा) यांनी पटकवला.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, मनिष मराठे व पदाधिकारी यांच्या हस्ते सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा ॲम्युचुअर ॲथलेटिक असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मुले व मुली राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र झाली असून ही स्पर्धा ठाणे येथे होणार आहे.
00000
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थी व आस्थापनांनी लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. तसेच 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे.
उमेदवाराची पात्रता
• किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे.
• किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.)
• उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे.
• कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in /#/register या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता
• आस्थापना/उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा.
• आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar. mahaswayam.gov.in/#/employer_registration या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावा.
• आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी.
• आस्थापना/उद्योगानी ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, सर्टीफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन, डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावा.
कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. या योजनेंतर्गत किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. खासगी क्षेत्रातील आस्थापना/उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापना/उद्योग/महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या 5 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. जिल्हास्तरीय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती या योजनेचा वेळोवेळी आढावा घेईल.
योजनादूत
शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिध्दी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी योजनादूत नेमण्याची योजना सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी 1 व शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण 50 हजार 'योजनादूत' नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूतांचे विद्यावेतनही या योजनेमधून अदा करण्यात येईल.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा.
00000
मुख्यमंश्री वयोश्री योजना (ग्रामीणस्तर) अर्ज करण्यासाठी 7 ऑगस्ट अंतिम मुदत
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास दि. 7 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर 3 हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत. त्यास अनुसरून सांगली जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण तसेच तालुका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स,उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी दाखल करावयाचा अर्ज विनामुल्य आहे. हा अर्ज ग्रामीणस्तरावर ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक तसेच नजिकच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांच्याकडे उपलब्ध असून नगरपालिका/नगरपंचायतस्तरावर मुख्याधिकारी तथा त्यांनी नेमून दिलेले नोडल अधिकारी यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत. अर्जात नमुद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज त्यांचेकडेच जमा करावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होवून पुढील वर्गात शिकत असलेल्या माजी सैनिक, दिवंगत माजी सैनिक पत्नीच्या / माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना संपूर्ण / उर्वरित कालावधीकरीता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधितांनी दि. 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली येथे प्रत्यक्ष अथवा 0233-2990712 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
00000
सोमवार, १५ जुलै, २०२४
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेपासून सांगली जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये, असे निर्देश कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे पुढे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी करत असताना कोणी पैशाची मागणी केल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. विंशेषत: ग्रामीण भागात या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी रिक्षाव्दारे प्रसिध्दी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत या योजनेच्या परिपूर्ततेसाठी तसेच या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी या योजनेसंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी सादरीकरण केले. तर योजनेपासून कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिली. या बैठकीसाठी तहसिलदार लिना खरात यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
00000
वारणा धरणात 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 40.43 (105.25), धोम 4.91 (13.50), कन्हेर 3.85 (10.10), वारणा 19.90 (34.40), दूधगंगा 10.56 (25.40), राधानगरी 4.59 (8.36), तुळशी 1.92 (3.47), कासारी 1.65 (2.77), पाटगांव 2.65 (3.72), धोम बलकवडी 0.92 (4.08), उरमोडी 2.47 (9.97), तारळी 2.27 (5.85), अलमट्टी 91.66 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 18 (40) व अंकली पूल हरिपूर 18.11 (45.11).
000000
जिल्ह्यात काल सरासरी 39.5 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा-इस्लामपूर तालुक्यात सर्वाधिक 71.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 40.7 (295.4), जत 4.5 (248.5), खानापूर-विटा 29.5 (254.4), वाळवा-इस्लामपूर 71.1 (391), तासगाव 34.5 (312), शिराळा 58.3 (495), आटपाडी 5.4 (222.1), कवठेमहांकाळ 28.9 (324.2), पलूस 52.7 (285.6), कडेगाव 38.3 (296.9).
00000
शनिवार, १३ जुलै, २०२४
वारणा धरणात 18.23 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.23 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 36.23 (105.25), धोम 4.84 (13.50), कन्हेर 3.67 (10.10), वारणा 18.23 (34.40), दूधगंगा 9.88 (25.40), राधानगरी 4.21 (8.36), तुळशी 1.89 (3.47), कासारी 1.50 (2.77), पाटगांव 2.55 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 2.27 (9.97), तारळी 2.02 (5.85), अलमट्टी 90.33 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 7.9 (40) व अंकली पूल हरिपूर 8.5 (45.11).
000000
जिल्ह्यात काल सरासरी 8.6 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 37.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.9 (254.5), जत 0.1 (244), खानापूर-विटा 1.9 (224.9), वाळवा-इस्लामपूर 15.6 (319.9), तासगाव 3.3 (277.3), शिराळा 37.7 (436.7), आटपाडी 0.9 (216.7), कवठेमहांकाळ 1.7 (295.3), पलूस 5.5 (232.9), कडेगाव 6.2 (258.6).
00000
शुक्रवार, १२ जुलै, २०२४
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना लाभासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांची नोंदणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज
सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 58 हजार 679 महिलांनी ऑनलाईन तर 67 हजार 2 महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे. या प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज योजनेबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामुल्य आहे. पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहेत. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, लाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र सादर करावे). परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. नवविवाहीत महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सांगली अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांगली यांच्याशी सपंर्क साधावा.
उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यासाठी रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. यादी जाहीर केलेल्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत तक्रार नोंदविता येईल. तक्रर अंगणवाडी सेविका / मुख्य सेविका / सेतु सुविधा केंद्रामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नोंदविता येईल. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत असून तक्रार निवारणानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.
गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहेत. या समितीमार्फत गावपातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. महापालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
0000
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जुलैला
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी दिली.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे.
00000
शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठीच्या बैठकीसाठी शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन, नियोजनासाठी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
मिरज व तासगाव तालुक्यासाठी 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासाठी 16 जुलै रोजी दुपारी 3 वाजता नव कृष्णा व्हॅली इंग्लीश मेडियम स्कुल कुपवाड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 जुलै रोजी जत व कवठेमहांकाळ तालुक्यासाठी सकाळी 11 वाजता पी.डि.व्ही.पी. कॉलेज कवठेमहांकाळ येथे तर खानापूर व आटपाडी तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता कि.क. गुळवणी माध्यमिक विद्यालय कडेगाव येथे, दिनांक 19 जुलै रोजी कडेगाव व पलुस तालुक्यासाठी सकाळी 11 वाजता मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे तर शिराळा व वाळवा तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-2012 अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित करावयाच्या भारतीय शालेय खेळ महासंघाव्दारे पुरस्कृत 93 खेळ प्रकारांचे आयोजन करण्यास शासनस्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे. 93 क्रीडा प्रकारापैकी 10 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा तालुकास्तरावर व इतर क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तर पासून घेण्यात येणार आहेत. इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी या शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होवू शकतील, असे श्री. बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
गुरुवार, ११ जुलै, २०२४
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर 52 कोटी 76 लाख व्याज परतावा - जिल्हा समन्वयक निशा पाटील
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात 5 हजार 953 मंजूर प्रकरणात विविध बँकांमार्फत देण्यात आलेल्या 591 कोटी 76 लाख रूपये कर्जापोटी महामंडळाकडून आत्तापर्यंत 52 कोटी 76 लाख रूपये कर्जव्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. एप्रिल 2023 पासून आत्तापर्यंत 208 कोटी 53 लाख रूपये बँकेतर्फे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महामंडळाकडून यासाठी 82 लाख 75 हजार व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, अशी माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, सन 2018-2019 या वर्षात 533 प्रकरणे, सन 2019-2020 मध्ये 717, सन 2020-2021 मध्ये 761, सन 2021-2022 मध्ये 843, सन 20222-2023 मध्ये 1 हजार 163 आणि सन 2023-2024 मध्ये 1 हजार 936 प्रकरणे विविध बँकामार्फत मंजूर करण्यात आली आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज फेब्रुवारी 2018 ते आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे सुरु आहे. महामंडळाच्या कामकाजामध्ये अतिशय पारदर्शकता आहे. लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणांच्या प्रस्तावाबाबत महामंडळामार्फत नियमित पाठपुरावा केला जातो. तसेच रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्यती मदत केली जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात असून व्याज परतावा लाभार्थ्यांना वेळेवर मिळत आहे त्यामुळे बँकांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील प्रतिनिधी बँकांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि दर तीन महिन्याला प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती येथे बी.एल.बी.सी. बैठकीमध्ये महामंडळाकडील योजनांच्या कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास लाभार्थी आणि बँका यांचे प्रश्न सोडवत आहेत. जिल्हास्तरावरील डी.एल.सी.सी. बैठकीमध्ये यावरती चर्चा करण्यात येऊन लाभार्थींना मदत करण्याबाबत बँकेंच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनेमध्ये जिल्ह्यात बँकांनी आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डी.एल.सी.सी. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक यांचा सत्कार करण्यात आला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी किंवा शंका असेल तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथील जिल्हा कौशल्य विभागाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहनही श्रीमती निशा पाटील यांनी केले आहे.
000000
वारणा धरणात 17.36 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 17.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 33.03 (105.25), धोम 4.65 (13.50), कन्हेर 3.46 (10.10), वारणा 17.36 (34.40), दूधगंगा 9.06 (25.40), राधानगरी 3.98 (8.36), तुळशी 1.79 (3.47), कासारी 1.31 (2.77), पाटगांव 2.40 (3.72), धोम बलकवडी 0.52 (4.08), उरमोडी 2.10 (9.97), तारळी 1.87 (5.85), अलमट्टी 84.59 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 8.6 (40) व अंकली पूल हरिपूर 9.3 (45.11).
000000
जिल्ह्यात काल सरासरी 1.8 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.9 (243.7), जत 0.3 (233.7), खानापूर-विटा 0.6 (221.1), वाळवा-इस्लामपूर 0.3 (299.1), तासगाव 3.4 (271.4), शिराळा 2.9 (379.8), आटपाडी 0.0 (215.4), कवठेमहांकाळ 2.7 (292.8), पलूस 0.3 (223.1), कडेगाव 2.2 (248.7).
00000
सोमवार, ८ जुलै, २०२४
पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या 19 पिकासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पीक स्पर्धेतील पीके - खरीप पिके - भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण 11 पीके).
पात्रता निकष - स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर (0.20 हे.) व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 (0.40 हे.) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-31), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील पोषित केलेल्या चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख मुग व उडीद पीकासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2024, भात, खरिप ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल ३१ ऑगस्ट २०२४. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क - पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रकम 300 रूपये राहील व आदिवासी गटासाठी रकम 150 रूपये राहील.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका पातळीवर प्रथक क्रमांकास 5 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 3 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 2 हजार रूपये बक्षीस आहे. जिल्हा पातळीवर प्रथक क्रमांकास 10 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 7 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 5 हजार रूपये बक्षीस आहे. राज्य पातळीवर प्रथक क्रमांकास 50 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 40 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 30 हजार रूपये बक्षीस आहे.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
शिराळा तालुक्यात 16.1 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 16.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.5 (239.3), जत 1.3 (230.5), खानापूर-विटा 1.1 (219), वाळवा-इस्लामपूर 9.6 (298.9), तासगाव 1.4 (266.6), शिराळा 16.1 (374.1), आटपाडी 1.1 (210.2), कवठेमहांकाळ 0.5 (290), पलूस 3.1 (222.1), कडेगाव 1.2 (245.9).
00000
वारणा धरणात 16.66 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 16.66 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 30.84 (105.25), धोम 4.60 (13.50), कन्हेर 3.06 (10.10), वारणा 16.66 (34.40), दूधगंगा 8.33 (25.40), राधानगरी 3.87 (8.36), तुळशी 1.71 (3.47), कासारी 1.25 (2.77), पाटगांव 2.32 (3.72), धोम बलकवडी 0.45 (4.08), उरमोडी 1.90 (9.97), तारळी 1.67 (5.85), अलमट्टी 64.59 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 11.6 (40) व अंकली पूल हरिपूर 15.4 (45.11).
000000
रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल
सांगली दि. 8 (जि.मा.का.) : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर रस्ता तयार करून सदर पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी हे आदेश जारी केले असून वाहतूक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेशही निर्गमित केले आहेत.
जनतेच्या व वाहन चालकाच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे, माहिती लावणे संदर्भातील उपाययोजना अतिरिक्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई, कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी एकत्रितपणे कराव्यात. अतिरिक्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई व सहा. विभागीय अभियंता मध्य रेल्वे मिरज यांनी रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरून होणारी वाहतूक वळविण्यात आल्याबाबतची माहिती जनतेला होण्यासाठी ग्रामीण व शहरातील महत्वाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी याबाबतची अधिसूचना तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस पुरेशी प्रसिध्दी द्यावी. तसेच या निर्णयाची तात्काळ व संपूर्ण अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने RPF / Railway Police कडील अंमलदार यांची नियुक्ती करण्यात यावी. ही अधिसूचना दि. 13 जुलै 2024 रोजीपासून अंमलात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
00000
सोमवार, १ जुलै, २०२४
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते रोपे विक्री कक्षाचे उद्घाटन
सांगली, दि. 1 (जि.मा.का.) : सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रोपे विक्री कक्ष सुरु करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या कार्यक्रमास उप वनसंरक्षक निता कट्टे, सहायक उप वनसंरक्षक अजित साजने, सहाय्यक वनसंरक्षक रणजित गायकवाड, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, वनक्षेत्रपाल विक्रम गुरव यांच्यासह वन व सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते महिलांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
या कक्षामार्फत केंद्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना "एक पेड माँ के नाम" व राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना "अमृत वृक्ष आपल्या दारी" या दोन योजना व सद्यस्थितीत सुरु असलेली वन महोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीकरीता उपलब्ध रोपांची माहिती देऊन रोपे वाटप करण्यात येणार आहेत. रोप लागवड करण्याकरीता आवश्यक रोपे या कक्षावर व दोन्ही विभागातील रोपवाटीकेमध्ये उपलब्ध रोपे वन महोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात मिळणार आहेत. रोपे विक्री कक्षामार्फत "अमृतवृक्ष" मोबाईल अॅप व वेब अॅप बाबतची माहिती देण्यात येणार असून जिल्ह्यात उपलब्ध रोपे, रोपवाटीकांचे स्थळ व रोपवाटीका समन्वयक आदींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
"एक पेड माँ के नाम" व "अमृत वृक्ष आपल्या दारी या मोहिमेत सांगली जिल्ह्यातील नागरिक, निसर्गप्रेमींनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी व वृक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागामार्फत यावेळी करण्यात आले.
00000
कृषी दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
सांगली, दि. 1 (जि.मा.का.) :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने कृषि विभाग व राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते पालखीमध्ये गुलाबाचे रोपटे ठेवून प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, उप वनसंरक्षक निता कट्टे, सहायक उप वनसंरक्षक अजित साजने, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे यांच्यासह कृषी व वन विभागातील अधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
0000
भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध
सांगली, दि. 1 (जि.मा.का) : उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधिनस्त विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपीक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि 28 एप्रिल 2023 रोजी निवडसूची व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. आता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडील दि. 26 एप्रिल 2024 व 19 जून 2024 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार ऑनलाईन परिक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने दि. 17 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षायादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द केली आहे, असे पुणे प्रदेश पुणे चे उपसंचालक भूमि अभिलेख अनिल माने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
रविवार, ३० जून, २०२४
सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ
सांगली दि. 30 (जि.मा.का.) : सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मिरज येथे बोलताना केले.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन एमआरआय मशीनचे लोकार्पण व नूतनीकरण केलेल्या सीएसएसडी विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व प्रियांका राठी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स व विद्यार्थी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खाजगी रुग्णालयात ज्या प्रमाणे आधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध आहे, त्याच प्रमाणे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्र सामग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय सेवांसाठी मिरज शहराचा मोठा लौकिक आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून आरोग्य सेवांसाठी अधिकचा निधी दिला ही बाब कौतुकास्पद आहे. या निधीमुळेच नवीन एमआयआर मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले. सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयास लागणाऱ्या आवश्यक यंत्र सामग्रीसाठी व आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वस्तीगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवावा. या दुरुस्तीच्या कामास मान्यता व निधी दिला जाईल. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग विभाग सुरू करण्याबाबत मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन येथून बाहेर जाणाऱ्या भावी डॉक्टरांनी समाजातील गोर गरीब रुग्णांची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
सांगली मिरज शहरे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जातात. सामान्य माणसाला दर्जेदार व कमी खर्चात आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने नेहमी प्राधान्य दिले असून सांगली, मिरज मधील शासकीय रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन दिल्या जातील, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ते म्हणाले मिरज महाविद्यालयाच्या रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५ कोटीचे एमआरआय मशीन उपलब्ध झाल्याने या भागातील रुग्णांच्या उपचारासाठी याची मोठी मदत होईल. कमी खर्चात अचूक निदान झाल्याने पुढील उपचारासाठी त्याचा लाभ होईल. तसेच सी.एस.एस.डी विभागामुळे दान केलेले अवयव आणि वैद्यकीय साधन सामग्रीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होईल.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, कोरोना काळात मिरज रुग्णालयाने चांगले काम केले आहे. या ठिकाणी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज येथील शासकीय रुग्णालयांमधील आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल.
अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात रुग्णालयाने चांगले काम केले आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन सुविधा निर्माण होत असल्याने याचा सामान्य रुग्णांना लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचा सेवा निवृत्तीनिमित्त मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचे स्वागत करण्यात आले.
०००००
मंगळवार, २५ जून, २०२४
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त् पुनरिक्षण कार्यक्रम घोषित - जिल्हायधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली दि. 25 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्ते पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे, अशी माहिती जिल्हाडधिकारी व जिल्हाप निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्ता पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25 जुलै 2024 ते 9 ऑगसट 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तिरीय अधिकाऱ्याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8 चे अर्ज उपलब्धस होतील. दिनांक 2 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्येा अर्ज करुन शकतील. दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रसिध्दक होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्येप अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्याम तपशीलात दुरुस्तीा करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थालांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यां ग व्य क्तीं ना चिन्हां कित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्ये अर्ज करता येईल. Voter Portal, Voter Helpline App या ऑनलाईन पध्द्तीचा वापर करुन मतदार स्वात: नोंदणी / वगळणी / स्थoलांतरण / दुरुस्ती इत्यादी करु शकतात.
सांगली जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व 282-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे स्थांपन करण्या त आली असून येथे ऑफलार्दन पध्दयतीने अर्ज सादर केले जाऊ शकतात. तसेच मतदार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थिळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करु शकतात.
पुर्व-पुनरिक्षण उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणकरण करणे, दुबार/समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/विभाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीला मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना 1-8 तयार करणे आणि 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्याचा कालावधी मंगळवार, 25 जून 2024 ते बुधवार, 24 जुलै 2024 असा आहे.
पुनरिक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे- गुरुवार, 25 जुलै 2024, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- गुरुवार, 25 जुलै 2024 ते शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024, विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे, पुरवणी याद्यांची छपाई करणे- सोमावार, 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक मंगळवार 20 ऑगस्ट 2024 असा आहे.
000000
राईट टू गीव्ह अपचे अर्ज ३० जून पर्यंत करण्याचे आवाहन
सांगली दि. 25 (जि.मा.का.) : अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून महाडिबीटी पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानानने राईट टू गीव्ह अप पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्रार्चायांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन मधून आपला अर्ज Revert Right to give up Applicaton या पर्यायाचा वापर करुन दि. 30 जून 2024 पूर्वी Revert Back करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Revert Back झालेला अर्ज देखील विहित वेळेत म्हणेजच दि. 30 जून पूर्वी विद्यार्थी स्तरावरुन तसेच महाविद्यालयस्तरावरुन ऑनलाईनरित्याच अर्ज समाज कल्याण कार्यालय स्तरावर विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवरील राईट टू गीव्ह अप या पर्यायाचे बटन नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राचार्य लॉगीनला सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत Revert Back करुन घेण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
00000
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील कर्ज योजना ऑनलाईन अर्जासाठी पोर्टल विकसित
सांगली दि. 25 (जि.मा.का) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई मार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजने (कर्ज मर्यादा १ लाख रू.) तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेली PMAJAY योजनाचे कर्ज प्रस्तावाचे अर्ज गरजू लाभार्थीना ऑनलाईनव्दारे भरता यावेत या करिता पोर्टल विकसित केले असून त्याची वेबसाईट www.lokshahir.in अशी आहे.
मातंग समाज व तत्सम 12 पोटजाती, मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या जातीतील इच्छुक अर्जदारांनी महामंडळाकडील कर्जासाठी अर्ज ऑनलाईनव्दारे जमा करावेत. योजनेत अर्ज भरांना पोर्टल बाबत काही अडचण आल्यास 9272173469 या भ्रमणध्वनीवर सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.
000000
चिंचणी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू
सांगली दि. 25 (जि.मा.का) : चिंचणी (ता. कडेगाव) येथे सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जमाती, अपंग, अनाथ, आर्थिक मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या इयत्ता 8 वी, 11 वी, प्रथम वर्ष शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनींसाठी प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार मोफत प्रवेश सुरू आहेत. प्रवेशासाठी अर्ज वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत, असे वसतिगृहाच्या अधिक्षका यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
वसतिगृहात निवास, भोजन, शालेय साहित्य (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, इत्यादी), शालेय गणवेश दोन नग, रेनकोट/ छत्री, गमबूट अशा सुविधा मोफत दिल्या जातात. मासिक निर्वाह भत्ता 600 रूपये, सहल खर्च 2 हजार रूपये, महाविद्यालय विभाग स्टेशनरीकरिता 4 हजार रूपये, प्रोजेक्ट 1 हजार रूपये, गणवेशाकरिता 2 हजार रूपये अशा सुविधा दिल्या जातात. प्रवेशासाठी वसतिगृहाच्या अधिक्षका यांच्याशी संपर्क साधावा.
000000
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जुलै रोजी रोजगार मेळावा - सहायक आयुक्त जमीर करीम
सांगली दि. 25 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदासाठी गुरुवार, 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करुन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt. I.T.I),गोविंदराव मराठे इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. देशपांडे यांनी केले आहे.
खाजगी क्षेत्रात, लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये शिकाऊ उमेदवार पदांसाठी एकूण 10 खाजगी नामवंत कंपन्या सहभागी होणार असून एकूण 238 पदे भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
सोमवार, २४ जून, २०२४
रमाई आवास योजनेच्या लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे / कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रूपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रासाठी – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयाशी, नगरपालिका क्षेत्राकरिता – संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालयाशी व ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करता येईल.
अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रेमध्ये जागेचा 7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र / 8 अ उतारा, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधारकार्ड, घरपट्टी / पाणीपट्टी / वीजबील इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेतून लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी व्यक्तीची उत्पन्न मर्यादा 1 लाख रूपये व शहरीसाठी 3 लाख रूपये इतकी आहे.
00000
तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नोंदणी करावी - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON - https:// transgender.dosje.gov.in) हे राष्ट्रीय पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेकामी ऑनलाईन अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींनी या पोर्टलवर नोंदणी करून ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
तृतीयपंथीयाचे कल्याण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण कायदा 2019 व 2020 व्दारे मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अर्ज भरताना तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड / मतदानकार्ड / पॅनकार्ड / जन्माचा दाखला / रेशनकार्ड / पासपोर्ट / पासबुक / जातीचा दाखला / मनरेगा कार्ड या नमूद दस्तऐवजांपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि रहिवासाबाबत विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण कायदा 2020 अन्वये तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र / ओळखपत्र देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत, श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त प्रकरण मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी केले आहे.
या लोकअदालतमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावित, अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किवा आभासी (Online mode) पध्दतीने सहभागी होऊ शकतात. जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकीलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्याची पक्षकारांना संधी
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली खटले निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध झाली असून ज्या पक्षकारांना प्रलंबित खटले तडजोडीद्वारे निकाली काढावयाचे असतील, अशा पक्षकारांनी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांनी केले आहे.
नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह होत आहे. या विशेष लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, ती तडजोडीने मिटावित, अशी इच्छा असणाऱ्या पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहेत. त्यासाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वबोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी घेण्यात येणार आहे. संबंधीत पक्षकार प्रत्यक्ष व आभासी (Online mode) पध्दतीने यात सहभागी होऊ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव तथा न्यायाधीश गि. ग. काबळे यांनी केले आहे.
00000
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत पक्षकार, वकीलांनी संमती अर्ज सादर करावेत
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकआदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकीलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क कमांक आणि ईमेल पत्त्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या sangli-disa.mh@bhc.gov.in या ईमेलवर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के शर्मा यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सांगली जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांपैकी काही प्रलंबित प्रकरणांची यादी जिल्हा न्यायालयाच्या https://sangli.dcourts.gov.in/ या संकेत स्थळावर प्रकाशीत केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 5 प्रकरणांचा समावेश असून ही प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबत जिल्ह्यातील 16 नोटीसा पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आल्या आहेत. तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकीलांना दिली जाईल. पक्षकार प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी कळविले आहे.
00000
शुक्रवार, २१ जून, २०२४
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याीचे आवाहन
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अशा विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र दरेकर यांनी केले आहे.
व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12 टक्के पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
1) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत) - बँकेने 10 लाख रूपये पर्यंतच्या लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत /नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.
2) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते ५० लक्ष पर्यंत) - फक्त महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.
3) महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना (रु.५.०० लक्ष ते १०.०० लक्ष पर्यंत)- राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे उत्पादन, प्रक्रिया, मुल्य आधारित उद्योगाकरीता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 लक्ष ते 10 लक्षपर्यंत कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाचा परतावा उपलब्ध करून देण्यात येईल. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे.
4) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते २० लक्ष पर्यंत) – उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रूपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रूपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल.
अर्ज करण्याची कार्यपध्दती - अर्ज करण्यासाठी वेबसाईट www.msobcfdc.org असून महामंडळाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर MENU मध्ये कर्ज योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी NEW REGISTRATION मध्ये जावून USER ID & PASSWORD तयार करुन संपूर्ण माहिती भरावी. अर्जासोबत फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बील/टॅक्स पावती, रहिवासी दाखला, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचेकडील), जन्माचा दाखला, शैक्षणिक पुरावा, जातीचा दाखला इत्यादी मुळ कागदपत्र स्कॅन करुन लोड करावीत.
00000
निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योग करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : निरोगी राहण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करण्याची गरज आहे. प्रत्येकाने किमान अर्धा तास दररोज योग करावा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम प्रसंगी केले.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग व बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज व आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज व आयुर्वेदिक महाविद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, बिरनाळे कॉलेजचे संस्थापक सागर बिरनाळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वाटेगावे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर नागरिकांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात विविध आसने, प्राणायम, ध्यान इत्यादी योग क्रिया घेण्यात आल्या.
00000
लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै - महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी
सांगली दि. 21 (जि.मा.का.) : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2024 असून सांगली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले आहे.
जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग आधार हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षेपुर्वीचा नोंदणीकृत असावा. मागील तीन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग हा कोणत्याही संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच यापुर्वी राज्य अथवा केंद्र शासनाचा कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा. पुरस्कारासाठी लघु उद्योगाची निवड करताना त्याने केलेली भांडवली गुंतवणूक, अधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थापन, घटनेचे ठिकाण, सामाजिक कार्य, कर्मचारी सोयी सवलती, आयात-निर्यात क्षमता, स्वावलंबन तसेच उद्योजक हा नवीन पिढीतील नवउद्योजक असावा. उत्पादित वस्तु बाबतची गुणवत्ता इत्यादी विचार करण्यात येतो.
जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास 15 हजार रूपये व व्दितीय क्रमांकास 10 हजार रूपये, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र तसेच मानचिन्ह देण्यात येते. पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज करण्याकरीता तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन सांगली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ
सांगली दि. 21 (जि.मा.का.) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 18 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समिती पुणे चे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषण महाराष्ट्र पुणे चे संचालक राहूल रेखावार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इत्यादी बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 22 जून 2024 ते दि. 7 जुलै 2024 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 22 जून 2024 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 7 जुलै 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
00000
गुरुवार, २० जून, २०२४
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज येथे कार्यक्रमाचे आयोजन
सांगली दि. 20 (जि.मा.का.) : 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत असून या निमित्ताने जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग व बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज, आयकर कार्यालय जवळ, सांगली येथे सकाळी 7 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी दिली.
योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आाहे. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोग मुक्त होण्यामध्ये मदत होऊन सकारात्मक उर्जा मिळते.
योग दिन कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, मान्यवर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध योग संघटना उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. बोरवडेकर यांनी कळविले आहे.
०००००
बँकांनी पीक कर्ज व प्राथमिक क्षेत्राकरिता कर्ज वाटप गतीने करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिध
ी
सांगली दि. 20 (जि.मा.का.): खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबरोबरच प्राथमिक क्षेत्राकरीता देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गतीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आरबीआयचे अग्रणी अधिकारी बिस्वजीत दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर, माविम चे व्यवस्थापक कुंदन शिनगारे, बीओंआय आरसेटी चे संचालक महेश पाटील तसेच जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक व विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पीक कर्ज वाटपाचा बँक निहाय आढावा घेतला. चालू वर्षाचे पीक कर्ज वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना पीक विमा व हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदण्याकरिता बँकांनी पीक विमा हप्ते विमा कंपनीकडे वेळेत वर्ग करावेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता बँका आणि विविध महामंडळानी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेल्या शासकीय विभाग, महामंडळे व बँकांना कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना नोटीस बजवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
कृषी पायाभूत विकास निधी (AIF व AHIDF), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), पीएम विश्वकर्मा, पीएमइजीपी,एनएलएम, सीएमइजीपी, पीएम स्वनिधी व महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याबाबत बँकाना व सर्व शासकीय विभागांना जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.
जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे प्रस्ताव बँकांनी वेळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा सन २०२४-२५ अहवालाची माहिती दिली. त्यांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्या अंतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे एकूण प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट ८ हजार ७९० कोटी व अप्राथमिक क्षेत्राकरिता ३ हजार ५०० कोटी असे एकूण उद्दिष्ट १२ हजार २९० कोटीचे ठेवल्याचे सांगितले. सन २०२४-२५ करिता गाई-म्हैशी व मासेमारी करिता कर्ज वाटपाचे आवाहन नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक निलेश चौधरी यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी PMFME व AIF योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन बँकांना केले. यावेळी उपस्थितांना उप आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. अजय थोरे यांनी NLM योजना व AHIDF योजने संदर्भात उपस्थितांना माहिती दिली.
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांगली यांनी सन २०२४-२५ मधील प्रशिक्षणाचा आढावा दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवनवीन उपक्रमांचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याबाबत सूचना केल्या.
या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा सन २०२४-२५ व आरसेटी च्या वार्षिक कार्यअहवालाचे चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गत वर्षात CMEGP योजनेत चांगली कामगिरी केलेल्या बँकांना प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. गत वर्षात महिला बचत गटांना उमेद अभियान, माविम व इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना पीएमस्वनिधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजना चांगल्याप्रकारे राबवल्याबद्दल संबंधित महामंडळ व सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कौतुक केले.
00000
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली दि. 20 (जि.मा.का.) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती - क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि तालुका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती - क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 43 हजार रूपये रक्कम लाभ म्हणून वित्तरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधवा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे.
0000000
शासकीय वसतिगृहांसाठी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली दि. 20 (जि.मा.का.) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी इच्छुक मालकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक वसतिगृह शासनाकडून सुरु करण्यात येणार आहे. ही वसतिगृहे सुरु करण्यासाठी प्रति वसतिगृह सुमारे 8 हजार ते 10 हजार चौ. फुट क्षेत्रफळ इमारत आवश्यक आहे. वसतिगृहासाठी भाड्याने घेण्यात येणाऱ्या इमारतीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेले भाडे दरमहा मंजूर केले जाणार आहे.
इच्छुक इमारत मालकांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत असल्यास शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाडेतत्वावर शासनास देण्याकामी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णय दि. 13 मार्च 2023 मधील परिशिष्ट 2 व 3 मधील प्रपत्रात शासकीय वसतिगृहासाठीचा प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली यांच्याकडे तात्काळ सादर करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे.
00000
पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजनेच्या लाभासाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन
सांगली दि. 20 (जि.मा.का.) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्धवारे प्रवेश घेतलेल्या पंस्तु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना रक्कम 43 हजार रुपये रक्कम लाभ म्हणून वितरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकामी तात्काळ अर्ज सादर करावेत. या योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे.
000000
मंगळवार, १८ जून, २०२४
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी - मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा पासिंग आऊट व दिक्षांत समारंभ संपन्न
सांगली दि. 18 (जि.मा.का.) : वनपरिक्षेत्र अधिकारी हे वन विभागाचा कणा आहेत. नवोदित अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत सक्षमपणे व प्रमाणिकपणे करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य, पुणे चे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण, यांनी व्यक्त केली.
कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम, कुंडल वन प्रबोधिनी चे महासंचालक जे.पी.त्रिपाठी, कांदळवन मुंबई चे उपवनसंरक्षक डॉ. शैलेद्रकुमार जाधव, उपवनसंरक्षक सांगली नीता कट्टे, प्रबोधिनीचे संचालक व सत्र संचालक भरत बाबूराव शिंदे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे आदी उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण यांनी काम करत असताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत अनेक मार्गदर्शनपर सूचना केल्या. तसेच केलेल्या कामाची नियमितपणे नोंद ठेवावी, नियमित दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी, असे केल्यास बदलत्या काळातील वन संरक्षण व संवर्धनाची आव्हाने सहज पेलता येतील असे त्यांनी सांगितले.
मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम म्हणाले, अधिकारी म्हणून काम करताना अनेक अडचणी व आव्हानांचा सामना करावा लागेल. तक्रारी करत न बसता अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या वन परिक्षेत्रात काम करताना प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांना उत्तम प्रकारे काम करण्यासाठी प्रेरित करावे. अतिक्रमणांपासून वनांच्या संरक्षणासाठी वन कर्मचारी यांची टीम करून त्यांच्या समवेत वन भ्रमंती करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी यांनी आपल्या भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या अधिनस्थ संचालक, वन शिक्षण, डेहराडून यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी पदासाठीच्या या प्रशिक्षणाबाबत तसेच प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांबाबत माहिती दिली. ही प्रबोधिनी देशातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. वनक्षेत्रपाल यांचा हरित योद्धे (Green Warriors) असा उल्लेख करून, वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण, विविध परिसंस्था व अधिवासांचे संरक्षण करून वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी वनक्षेत्रपाल यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रबोधिनीचे संचालक व या बॅचचे सत्र संचालक भरत शिंदे यांनी निकाल जाहीर केला. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व मानचिन्हांचे वितरण करण्यात आले.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या तुकडीमध्ये केरळ राज्यातील 33, पश्चिम बंगाल 6 व जम्मू काश्मीर 3 अशा एकूण 42 प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पश्चिम बंगाल मधील प्रशिक्षणार्थी नितीशकुमार महातो हे 83.88 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे कुंडल वन प्रबोधिनी येथे दि. १९ डिसेंबर २०२२ ते १८ जून २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १८ महिने कालावधीच्या नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला. तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडचे संचलन प्रबोधिनीच्या मैदानावर झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांचा स्टार ओपनिंग समारंभ संपन्न झाला.
प्रातिनिधिक स्वरुपात केरळचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी टि. के. श्रीनाथ, पश्चिम बंगालची वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी रोनिता दास व जम्मू काश्मीरचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी सुमित कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘अरण्य’ (ARANYA Memoir) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, यांनी केले तर आभार संचालक भरत शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास निवृत्त उपवनसंरक्षक एम. एस. भोसले, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी व वनविभागाचे इतर अधिकारी तसेच केरळ, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर या राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले प्रशिक्षणार्थी, अधिकाऱ्यांचे पालक उपस्थित होते.
00000
प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली दि. 18 (जि.मा.का.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली आणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव दि. 30 जून 2024 पर्यंत दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवसापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटूंबाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूनां आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परिक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधी नुसार टप्प्या टप्प्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल.
सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावा. सांगली जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, त्याच संस्था आपला प्रस्ताव दाखल करू शकतील. 30 जून नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे -अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे. अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा लागेल.
00000
स्वावलंबन पोर्टलचे अपग्रेडचे काम सुरू
सांगली दि. 18 (जि.मा.का.) : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलव्दारे सांगली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तथापी, या स्वावलंबन पोर्टलचे अपग्रेड करण्याचे काम 5 मे पासून सुरू आहे. हे पोर्टल सुरू होईपर्यंत दिव्यांगांचे कोणतेही प्रमाणपत्र किंवा त्यांची नोंद पोर्टलवर होणार नाही, अशी माहिती रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
00000
जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी
सांगली दि. 18 (जि.मा.का.) : सांगली जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
या बैठकीत दि. 10 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता घेणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2023-24 अंतर्गत अंतिम सुधारीत तरतुदीस व मार्च 2024 अखेरील खर्चास मान्यता घेणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपायोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2024-25 करिताचे नियोजन आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे, अशी या बैठकीची विषयसूची आहे.
000000
शुक्रवार, १४ जून, २०२४
तृतीयपंथीयांसाठी 21 जून रोजी विशेष कार्यशाळा
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे वितरीत करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची प्राथमिक माहिती संकलित करणे, तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणबाबत काही अडचणी, समस्या असल्यास त्या जाणून घेणे, या व्यक्तींच्या शासनाप्रती असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी दि. 21 जून 2024 रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे होणार असून या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons हे पोर्टल दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. transgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतात. या पोर्टलवरून अधिकाधिक तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देण्यासाठी त्यांच्या माहितीचे संकलन करणे आवश्यक आहे. याकामी जिल्हास्तरीय तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीच्या मान्यतेने सर्व्हेक्षण अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.
या कार्यशाळेसाठी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट, पासबुक, जातीचा दाखला, मनरेगाकार्ड , शैक्षणिक पात्रताबाबत कागदपत्रे, दिव्यांग असलेस प्रमाणपत्र इ. नमूद दस्तऐवजांची छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत सोबत घेवून येणे आवश्यक असेल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)