शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५
वसंतदादा पाटील स्मारक, बुद्धिबळ भवन निर्मितीतील आवश्यक प्रशासकीय बाबींची कार्यवाही गतीने करावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- वसंतदादा पाटील स्मारक समिती फेररचनेचा प्रस्ताव सत्वर सादर करण्याचे निर्देश
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक भवन व भाऊसाहेब पडसलगीकर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ भवन या दोन्ही वास्तुंचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सांगलीच्या वैभवात भर पडेल. त्यामुळे या दोन्ही वास्तुंच्या निर्मितीतील आवश्यक त्या सर्व प्रशासकीय बाबींची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी गतीने करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक भवनचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण तसेच भाऊसाहेब पडसलगीकर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ भवळ निर्मिती यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जयश्री पाटील, वास्तुविशारद प्रमोद चौगुले आदि उपस्थित होते.
वसंतदादा पाटील स्मारक, बुद्धिबळ भवन या दोन्ही वास्तु चांगल्या दर्जाच्या होतील, यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये. तसेच, त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी गतिमानतेने कार्यवाही व्हावी, यासाठी आपण दर आठवड्याला याबाबतचा आढावा घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील स्मारकाचा उर्वरित कामाचा प्रस्ताव शासकीय स्तरावर प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हे स्मारक योग्य पद्धतीने पूर्ण होण्यासाठी स्मारक समितीची फेररचनेचा प्रस्ताव सत्वर सादर करावा. स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभाल दुरूस्तीच्या खर्चाची तरतूद होईल, यासाठी या स्मारकामध्ये व्यावसायिक पद्धतीने रेस्तराँ सुरू करण्याचा पर्याय तपासावा, असे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण पालकमंत्री असताना सन 2016-17 च्या दरम्यान भाऊसाहेब पडसलगीकर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ भवन संदर्भातील आराखडा व अंदाजपत्रक याबाबतचे प्रारंभिक प्रयत्न करण्यात आले होते. आता या इमारतीस पूर्णत्व येण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी. बुद्धिबळ भवनसाठी जागा मिळाली असून, आराखडा व अंदाजपत्रक तयार करून क्रीडा विभागाच्या मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, प्रस्तावित पाच मजली संपूर्ण बुद्धिबळ भवनची इमारत जिल्हा क्रीडा संकुल समिती अंतर्गत खाजगी तत्त्वावर किंवा बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर किंवा सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून पूर्ण करून क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासावा, असे सूचित करून त्यांनी दोन्ही वास्तुंच्या प्रशासकीय बाबी व निधी प्राप्तीसाठी आपण मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी क्रांतीकुमार मिरजकर यांनी कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाच्या उर्वरित कामाचा जवळपास 8 कोटी 28 लाख रूपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला असल्याचे सांगितले. प्रमोद चौगुले यांनी दोन्ही वास्तुच्या रचनांसंदर्भात सादरीकरण केले.
00000
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 2 सप्टेंबर 2025 ते 16 सप्टेंबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 2 सप्टेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 16 सप्टेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
00000
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली श्री गणेश आरती
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला येथे स्थापना करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तीचे पूजन करून आरती केली.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जयश्री पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेशाची प्रतिमा भेट दिली.
00000
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दाखले वितरण
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : समाजातील भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. मात्र, अशा समाजातील घटकांना जातीचे दाखले देऊन जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली आहे. याच संवेदनशीलतेने त्यांनी या घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अप्परच्या तहसीलदार अश्विनी वरुटे, जयश्री पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचण्याची गरज असून, यासाठी एम. एस. डब्ल्यू विद्यार्थ्यांचे सहाय्य घ्यावे. तसेच, प्रशासनावर केवळ अवलंबून न राहता संबंधित समाजातील नागरिकांनीही या योजना गरजू व वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील वड्डी, बोलवाड, मिरज आणि सुभाषनगर (मिरज) येथील लाभार्थींना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत मिरज तालुक्यातील सलगरे येथील तानाजी महादेव पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री तानाजी पाटील यांना तसेच एरंडोली येथील गुंडाप्पा नेमगोंडा पाटील व त्यांच्या पत्नी अनिता गुंडाप्पा पाटील यांना सात बारा वाटप करण्यात आले. सांगली व मिरजेतील मदारी, मांग गारूडी, बेरड, नंदीवाले समाजातील 35 लाभार्थींना जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच अंत्योदय योजनेतील 15 दिव्यांग व 2 दुर्धर आजारी लाभार्थींना ई शिधा पत्रिका वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार अमोल कुंभार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके व त्यांच्या टीमने मेहनत घेतली. प्रारंभी रा. हि. भिडे मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले. सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी केले.
00000
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : गुन्ह्यांचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व त्यासोबत प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने व अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलीस दलाला मोठी ताकद प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
पोलीस दलास प्राप्त मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा, पोलीस उपअधीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अरूण सुगावकर, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस विभागाची वाहतूक व्यवस्था चांगली होण्यासाठी दोन अद्ययावत बसेस सांगली पोलीस दलाच्या ताफ्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी घटनास्थळावरून अनेक नमुने घ्यावे लागतात. त्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन व प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. तसेच, या व्हॅनमध्ये सर्व गोष्टी अद्ययावत आहेत. अमली पदार्थ सापडले तर त्याचे वेगवेगळे प्रकार तपासण्यासाठी त्यामध्ये किट आहे. तसेच, सीसीटीव्ही असल्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी नमुने घेताना त्याचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करता येते. या अद्ययावत साधने व सुविधांमुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपपत्र लवकर तयार होऊन प्रकरण लवकर निकाली लागून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये असणारे विविध किट, त्याचा उपयोग याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व व्हॅनसाठी नियुक्त प्रशिक्षित स्टाफ यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक भैरु तळेकर व सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, राखीव पोलीस निरीक्षक श्री. अलदर, अंगुलीमुद्रा विभागाकडील सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
गुन्ह्यांचे बदलत जाणारे स्वरूप व त्यामुळे तपासामध्ये येणाऱ्या आव्हानांना आता वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साथ मिळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 कायद्याच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्यात एकूण 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्याकरिता दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी नव्याने अद्ययावत पध्दतीचे फॉरेन्सिक व्हॅन वाहन पुरविण्यात आले आहे. सदर व्हॅन सीएमएस कॉम्प्युटर्स इंडिया प्रा.लि. यांच्यामार्फत पुरवण्यात आले असून कंपनीमार्फत एक्सपर्ट व केमिकल अनॅलायजर पुरवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या अत्याधुनिक व्हॅनसोबत घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी 16 विविध टेस्टींग किटस् पुरवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ब्लड डिटेक्शन किट, एनडीपीएस किट, जीएसआर टेस्टींग किट, सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन किट, डीएनए किट इत्यादी प्रकारच्या महत्वाच्या किटस्चा समावेश करण्यात आलेला आहे.
00000
सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५
मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात व्यसनमुक्तीची चळवळ उभी केली आहे. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ही त्रिसूत्री यात राबवली जात आहे. अमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एनकॉर्ड समितीच्या माध्यमातूनही विविध उपाययोजना आखल्या गेल्या. यातील व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या अनुषंगाने एकूणच अमली पदार्थांचा धोका पाहता व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राची भूमिका मोलाची ठरणार आहे. यावर या लेखामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.
अंमली व मादक पदार्थ म्हणजे काय?
अंमली किंवा मादक पदार्थ म्हणजे असे रासायनिक किंवा नैसर्गिक पदार्थ जे मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात आणि व्यक्तिला तात्पुरत्या झिंग, आनंद, हलकेपणा, स्फूर्ती किंवा विस्मरण देतात. परंतु कालांतराने या पदार्थांवर शरीर आणि मन पूर्णपणे अवलंबून होऊन व्यसनाची साखळी तयार होते.
अमली पदार्थाचे साधारण ओपिओइड्स, सायकोस्टिम्युलंट्स, कॅनाबिस पदार्थ, सिंथेटिक ड्रग्स, स्निफिंग सोल्युशन, आणि झोपेच्या गोळ्या असे वर्गीकरण केले जाते. ओपिओइड्समध्ये ब्राऊन शुगर, हेरॉइन यांचा, सायकोस्टिम्युलंट्समध्ये कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी यांचा तसेच कॅनाबिस पदार्थांमध्ये गांजा, चरस यांचा, सिंथेटिक ड्रग्समध्ये एलएसडी, एमडीएमए यांचा आणि स्निफिंग सोल्युशनमध्ये व्हाइटनर आदिंचा समावेश होतो.
व्यसन सुरू होण्यामागची कारणे
कौटुंबिक तणाव : भांडण, आर्थिक संकट, तणावपूर्ण वातावरण, मित्रपरिवाराचा दबाव, मनोरंजन, ट्रेंड, फॅशन म्हणून, मानसिक आजार, नैराश्य, चिंता यावर स्वतःच्या मनाने शोधलेला उपाय म्हणून, कमकुवत आत्मविश्वास, एकाकीपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती, असुरक्षितता, चुकीची संगत, फिल्मी प्रभाव, सोशल मीडिया, जाहिरातींचा परिणाम
व्यसनांचा मानसिक परिणाम
अमली पदार्थ व्यसनामुळे विविध मानसिक विकार निर्माण होतात. यामध्ये नैराश्य (Depression), चिंता विकार (Anxiety Disorders), मानसविक्षिप्तता (Drug Induced Psychosis), व्यक्तिमत्त्व विकार (Personality Disorders) आत्महत्येचा धोका वाढतो. स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णयक्षमता यावर परिणाम होतो. व्यक्ती आत्मकेंद्रित, संशयी, आक्रमक बनते.
व्यसनांचा शारीरिक परिणाम
अंमली पदार्थांचा शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो. यकृत, हृदय, मेंदू, फुफ्फुसे यांचे नुकसान होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. एड्स, हेपाटायटिससारख्या आजारांचा धोका (इंजेक्शनद्वारे व्यसन करताना) असतो. अपचन, वजन घटणे, थकवा, अशक्तपणा, ओव्हरडोसमुळे अकस्मात मृत्यू होण्याचा धोका असतो.
व्यसनांचे सामाजिक परिणाम
व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होते. कुटुंबात सतत वाद, आर्थिक बुडवणूक, नातेवाईकांकडून अपमान, समाजाकडून बहिष्कार यामुळे घरात तणावाचे वातावरण राहते. शिक्षण बिघडते, करिअर संपते. चोरी, फसवणूक, हिंसाचार, अपघात वाढतात. रस्त्यावर बेवारस अवस्थेत फिरणारे युवक, गुन्हेगारांची संख्या वाढते. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः लैंगिक शोषण, मानसिक छळ, दुर्लक्षितता वाढते. समाजातील एकूणच शांतता, सुरक्षितता धोक्यात येते.
उपचार प्रक्रिया -
व्यसनमुक्ती ही केवळ व्यक्तिची लढाई नाही, तर संपूर्ण कुटुंब व समाजाची जबाबदारी आहे. अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तिंना रागावून, शिक्षा करून, समाजातून बाहेर काढून काही साध्य होत नाही. कारण व्यसन हा एक मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आजार आहे. त्यावर उपाययोजना, उपचार आणि पुनर्वसन यांची सांगड घालणे गरजेचे आहे. अमली पदार्थांच्या व्यसनावर उपचार करणे ही एक जटिल आणि बहुआयामी प्रक्रिया आहे. यामध्ये वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनांचा समावेश होतो.
वैद्यकीय उपचार -
1) डिटॉक्सिफिकेशन : ही प्रक्रिया व्यक्तिच्या शरीरातून अमली पदार्थ काढून टाकण्यासाठी केली जाते. यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली रूग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, कारण यावेळी व्यक्तीला तीव्र लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. रुग्णांच्या शारीरिक आजार व लक्षणासाठी उपायकारिता मेडिसीन विभागाची मदत घेतली जाते. कधी कधी रुग्णाला ICU मध्ये उपचाराची गरज पडते.
2) मानसोपचार
अ) कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी (CBT): ही थेरपी व्यक्तीच्या विचारसरणी आणि वागणुकीतील बदल घडवून आणते. यामुळे व्यसनाधीन व्यक्तिला अमली पदार्थांचा वापर टाळण्यासाठी नवीन रणनीती शिकता येतात.
आ) मोटिव्हेशनल इंटरव्हेंशन थेरपी (MIT): यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाते.
इ) कौटुंबिक थेरपी: कुटुंबातील सदस्यांना समाविष्ट करून व्यक्तीच्या भावनिक आणि सामाजिक समस्या वर उपाय शोधले जातात.
शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्यसनमुक्ती सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या सूचनांनुसार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांच्या समन्वयाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजकिरण साळुंखे, डॉ. महेश कुंभार डॉ. विक्रांत हजारे यांची मुख्य टीम या केंद्रात कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानसशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर आणि अमृता सोनवणे, नर्सिंग विभागांतर्गत अधिसेविका वंदना शहाणे, मानसोपचार तज्ज्ञ परिसेविका प्रिया राऊळ आणि प्राजक्ता काकडे तसेच, समाज सेवा अधीक्षक संजय खाडे व सूर्यप्रकाश राऊत व इतर कर्मचारी यांचा चमू टीम रुग्णांसाठी काम करतो. गंभीर रूग्णांबाबतीत आवश्यकतेनुसार औषध वैद्यक शास्त्र तज्ज्ञ डॉ. भोसले आणि डॉ. मगदूम यांची मदत घेण्यात येते.
हे व्यसनमुक्ती केंद्र 6 प्रकारच्या अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज करण्यात आले आहे. ही यंत्रसामुग्री राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. अमली पदार्थांमुळे भास, भ्रम, हिंसकपणा आत्महत्येचे विचार असे मानसिक आजार निर्माण होतात. त्यावर उपचार करण्यासाठी मॉडिफाइड इसीटी मशीन वापरण्यात येणार आहे. अमली पदार्थ आणि नशेच्या पदार्थांमुळे निर्माण होणारे भीती, घाबरटपणा, बेचैनी कमी करण्यासाठी मल्टी बिहेवियरल थेरपी' मशीन वापरण्यात येणार आहे. अमली पदार्थ घेण्यासाठी निर्माण होणारी तल्लफ दूर करण्यासाठी अव्हर्जन थेरपी मशीनचा उपयोग केला जाणार आहे. उदासपणा आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन आणि क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन मशीन वापरण्यात येईल. तर व्यसनाची इच्छा कमी करण्यासाठी, मनामधील उदासपणा व घाबरटपणा दूर करण्यासाठी, उतावीळपणा घालवून स्थिरता आणण्यासाठी RTMS म्हणजेच रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन मशीनचा वापर करण्यात येईल.
उपचार केंद्रात प्रवेश प्रक्रिया
या केंद्रात प्रवेशासाठी रुग्णास नातेवाईकांसोबत मनोविकार बाह्यरुग्ण विभाग नंबर 39 येथे डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टर तपासणी करून रुग्ण दाखल करण्यायोग्य असल्यास नातेवाईकाबरोबर रुग्णास भरती केले जाईल. आंतररूग्ण उपचार साधारणपणे दोन ते तीन आठवडेपर्यंत चालतात. उपचार व निवास हे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विनाशुल्क होतात. त्यासाठी रुग्णाला आवश्यक ती शासकीय कागदपत्रे सादर करावी लागतात. जर रूग्णांकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर साधारणपणे तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. हेच उपचार जर खाजगी रुग्णालयात घेतले तर साधारण 25 ते 40 हजार इतका खर्च येतो. शिवाय व्यसनाधीन व त्यांच्या कुटुंबियांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
वाढती व्यसनाधीनता चिंतेचा विषय बनला आहे. भावी पिढीला या संकटापासून वाचवणे, हे एक आव्हान बनले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळीच हा धोका ओळखून जानेवारी महिन्यापासून अमली पदार्थमुक्तीची चळवळ हाती घेतली आहे. या अनुषंगाने मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले अमली पदार्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची भूमिका मोलाची ठरणार असून हे केवळ उपचाराचे ठिकाण न ठरता नवजीवन देणारे पुनर्वसनाचे एक आधारस्तंभ आहे, हे निश्चित!
(संकलन - संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)
00000
शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५
शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजमध्ये होणार उपचार
- अद्ययावत यंत्रांनी सुसज्ज असा राज्यातील पहिलाच उपक्रम
- व्यसनाधीन व्यक्तिंवर होणार अद्ययावत पद्धतीने विनामूल्य उपचार
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त अशा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा लाभ घेऊन जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कुंभार, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या दौऱ्यात प्रजासत्ताक दिनी मी सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने प्रबोधन, कायद्याचा धाक आणि उपचार या त्रिसूत्रीतून आम्ही काम सुरू केले. प्रबोधनामध्ये जिल्हा परिषदेंतर्गत विविध माध्यमातून स्पर्धा घेऊन प्रबोधन केले. भावी पिढीला हा विळखा बसू नये, म्हणून अनुदानित शाळेत दररोज परिपाठाच्या वेळी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेतली जाण्याची कार्यवाही सुरू आहे. कायद्याचा धाकही पोलीस दलाने निर्माण केला. यातील तिसरा टप्पा म्हणजेच अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त असे व्यसनमुक्ती केंद्राचे आज लोकार्पण करत आहोत. या केंद्रामध्ये व्यसनाधीन लोकांवर यावर अद्ययावत पद्धतीने मोफत उपचार केले जाणार आहेत. या केंद्रामध्ये उपचार घेणारे व्यसनाधीन व्यक्ति व त्यांच्या नातेवाईकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या व्यसनमुक्ती केंद्रासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सखोल अभ्यास करून हे केंद्र कार्यान्वित केल्याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिले.
या केंद्रात मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कुंभार आणि डॉ. विक्रांत हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग अधिसेविका वंदना शहाणे, मानसोपचार तज्ज्ञ परिसेविका प्रिया राऊळ आणि प्राजक्ता काकडे यांची टीम उपचार करणार आहे. हे उपचार केंद्र अद्ययावत यंत्रांनी सुसज्ज असून, या केंद्रात मॉडिफाइड इसीटी मशीन, मल्टी बिहेवियरल थेरपी' मशीन, अव्हर्जन थेरपी मशीन, सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन, क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन मशीन आणि रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजेच आरटीएमएस मशीनच्या अशा अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहेत. खाजगी रूग्णालयात अशी उपचार पद्धती महागडी असते. पण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रामध्ये व्यसनाधीनांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. असा उपक्रम करणारा सांगली जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
अमली पदार्थ व्यसनामुळे अनेक मानसिक विकार निर्माण होतात. या व्यसनमुक्ती केंद्रात ओपिओइड्स : ब्राऊन शुगर, हेरॉइन, सायकोस्टिम्युलंट्स कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी, कॅनाबिस पदार्थ: गांजा, चरस, सिंथेटिक ड्रग्स: LSD, MDMA, स्निफिंग सोल्युशन, व्हाइटनर, झोपेच्या गोळ्या यातील व्यसनाधीन व्यक्तिंवर उपचार केले जाणार आहेत. गटचिकित्सा आणि कौटुंबिक समुपदेशन या दोन पद्धतीने उपचार केले जातील. नातेवाईकासोबत राहून उपचार घेण्याची सोय असून, औषधोपचार, मानसोपचार पद्धती, CBT (Cognitive Behavioural Therapy): विचार व वर्तन सुधारणे व Motivational Interviewing (MI): रुग्णाला उपचारासाठी तयार करणे या चार टप्पात उपचार केले जातील.
00000
सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : सांगली पोलीस मुख्यालयातील आर.सी.पी. वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोबाईल या वाहनांवर दृष्टीरक्षक पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा कॅमेरा 360 अंशातून फिरणार असल्याने महत्वाच्या घटनेचा रिअल टाइम डाटा मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विमला एम., पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णु कांबळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
आगामी काळात गणेशोत्सव सण व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सांगली शहर व परिसरातील आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे तसेच मोर्चा, निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून वाहनावर दृष्टीरक्षक म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावून निगराणी वाहने अद्ययावत करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून ही वाहने अद्ययावत करण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील पोलीस वाहनांवर पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे तसेच मोर्चा, निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी सांगितले.
00000
शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजमध्ये होणार उपचार
- अद्ययावत यंत्रांनी सुसज्ज असा राज्यातील पहिलाच उपक्रम
- व्यसनाधीन व्यक्तिंवर होणार अद्ययावत पद्धतीने विनामूल्य उपचार
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त अशा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा लाभ घेऊन जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कुंभार, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या दौऱ्यात प्रजासत्ताक दिनी मी सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने प्रबोधन, कायद्याचा धाक आणि उपचार या त्रिसूत्रीतून आम्ही काम सुरू केले. प्रबोधनामध्ये जिल्हा परिषदेंतर्गत विविध माध्यमातून स्पर्धा घेऊन प्रबोधन केले. भावी पिढीला हा विळखा बसू नये, म्हणून अनुदानित शाळेत दररोज परिपाठाच्या वेळी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेतली जाण्याची कार्यवाही सुरू आहे. कायद्याचा धाकही पोलीस दलाने निर्माण केला. यातील तिसरा टप्पा म्हणजेच अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त असे व्यसनमुक्ती केंद्राचे आज लोकार्पण करत आहोत. या केंद्रामध्ये व्यसनाधीन लोकांवर यावर अद्ययावत पद्धतीने मोफत उपचार केले जाणार आहेत. या केंद्रामध्ये उपचार घेणारे व्यसनाधीन व्यक्ति व त्यांच्या नातेवाईकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या व्यसनमुक्ती केंद्रासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सखोल अभ्यास करून हे केंद्र कार्यान्वित केल्याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिले.
या केंद्रात मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कुंभार आणि डॉ. विक्रांत हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग अधिसेविका वंदना शहाणे, मानसोपचार तज्ज्ञ परिसेविका प्रिया राऊळ आणि प्राजक्ता काकडे यांची टीम उपचार करणार आहे. हे उपचार केंद्र अद्ययावत यंत्रांनी सुसज्ज असून, या केंद्रात मॉडिफाइड इसीटी मशीन, मल्टी बिहेवियरल थेरपी' मशीन, अव्हर्जन थेरपी मशीन, सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन, क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन मशीन आणि रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजेच आरटीएमएस मशीनच्या अशा अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहेत. खाजगी रूग्णालयात अशी उपचार पद्धती महागडी असते. पण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रामध्ये व्यसनाधीनांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. असा उपक्रम करणारा सांगली जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
अमली पदार्थ व्यसनामुळे अनेक मानसिक विकार निर्माण होतात. या व्यसनमुक्ती केंद्रात ओपिओइड्स : ब्राऊन शुगर, हेरॉइन, सायकोस्टिम्युलंट्स कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी, कॅनाबिस पदार्थ: गांजा, चरस, सिंथेटिक ड्रग्स: LSD, MDMA, स्निफिंग सोल्युशन, व्हाइटनर, झोपेच्या गोळ्या यातील व्यसनाधीन व्यक्तिंवर उपचार केले जाणार आहेत. गटचिकित्सा आणि कौटुंबिक समुपदेशन या दोन पद्धतीने उपचार केले जातील. नातेवाईकासोबत राहून उपचार घेण्याची सोय असून, औषधोपचार, मानसोपचार पद्धती, CBT (Cognitive Behavioural Therapy): विचार व वर्तन सुधारणे व Motivational Interviewing (MI): रुग्णाला उपचारासाठी तयार करणे या चार टप्पात उपचार केले जातील.
00000
भावी पिढी वाचण्यासाठी बालवयातच नशामुक्तीचा संस्कार आवश्यक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- कुपवाडच्या शाळेत नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : अमली पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात नशामुक्तीचे मोठे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शाळेत परिपाठवेळी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा देण्यात येत आहे. बालवयातच हा संस्कार घडल्यास भावी पिढी अमली पदार्थांच्या संकटापासून वाचेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकूज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संचलित सौ. आ. आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड व अकूज इंग्लिश मिडिअम स्कूल कुपवाड येथे आयोजित नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिणी घाणेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नशामुक्तीसाठी प्रबोधनाबरोबरच नशा करणारे आणि नशेच्या साहित्यांची विक्री करणाऱ्यांवर धाक निर्माण होण्यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. बालवयातच नशेच्या दुष्परिणामाबाबत मुलांच्यामध्ये जनजागृती केली तर भावी पिढी नशामुक्त घडेल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला व मुलीच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आहेच. पोलीस विभागामार्फतही पोलीस दादा व पोलीस दिदी, दामिनी अशा अभियानांतर्गत महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. पण, मुली व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय वयातच मुलींनी कराटे, ज्युडोचे प्रशिक्षण घ्यावे, जेणेकरुन त्यांना स्वसंरक्षण करता येईल. कराटे, ज्युडोसोबत परंपरागत लाठी काठीचेही प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व उपस्थितांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली. विद्यालयातील मुलींनी कराटेचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)