बुधवार, १५ जुलै, २०२०

स्वयंरोजगारासाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार - सहायक आयुक्त संजय माळी

सांगली, दि. 15 , (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र सांगली व शासकीय आय.टी.आय. जत / कवठेमहांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार इच्छुक युवक युवतींसाठी दिनांक 17 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली.
सदर सेमिनारचा लाभ meet.google.com/syt-rdnp-ozk या गुगल लिंकवरून घेता येईल. या सेमिनारमध्ये ग्रामीण महाराष्ट्रात कोविड नंतरच्या उद्योग व व्यवसाय संधी या विषयावर पयोद इंडस्ट्रिज चे चेअरमन देवानंद लोंढे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ए. बी. तांबोळी व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ इच्छुक युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहनही संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा