शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प अभियानांतर्गत कवठेमहांकाळ येथे 7 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिक, युवक-युवती तसेच विविध सार्वजनिक मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांनी केले आहे. अपघातग्रस्त, प्रसूतीतील माता, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. रक्ताला कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने स्वेच्छेने केलेले रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा