सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

भरती परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्स गठीत

उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद राज्यातील #भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६ स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६ स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : अमरावती ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६ स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६ स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६ स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाचे महत्त्वाचे पाऊल!

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

• सहा विभागांना याच महिन्यात भेटी • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६ स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६ स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : अमरावती ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६ स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६ स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६ स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. 0000

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणांतर्गत विभागीय आयुक्त मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)-2026 अंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त हे मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून काम पाहत आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षकांचा मंगळवार, दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी दौरा आयोजित करण्यात आला आहे. ते या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा करणार असून मतदार नोंदणी अधिकारी मिरज व सांगली यांच्या कार्यालयास भेट देऊन आढावा घेणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक यांच्या मंगळवार, दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 3 ते 3.15 या वेळेत 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 193 (जि. प. मुला मुलींची शाळा, नरसिंहगाव) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. त्यानंतर दुपारी 3.15 ते 3.45 या वेळेत 287 तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 187 (जि. प. प्राथमिक शाळा, अलकुड एम) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. दुपारी 3.45 ते 4.20 या वेळेत 281-मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 186 (मिरज हायस्कूल, मिरज) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. दुपारी 4.20 ते 4.45 वाजेपर्यंत 281 मिरज विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 150 (रोझरी इंग्लिश स्कूल, मिरज) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. दुपारी 4.45 ते 5.15 वाजेपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी (ERO), 281-मिरज यांच्या कार्यालयास भेट व आढावा बैठक. सायंकाळी 5.15 ते 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे विद्यमान खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. सायंकाळी 6 ते 6.25 वाजेपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी, 282- सांगली यांच्या कार्यालयास भेट व आढावा बैठक. सायंकाळी 6.25 ते 6.45 वाजेपर्यंत 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 157 (श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, सांगली) येथे भेट, बीएलओ व मतदारांशी चर्चा. सायंकाळी 6.45 ते 7.10 वाजेपर्यंत 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 148 (सुपर इंग्लिश मीडियम स्कूल, सह्याद्रीनगर, मंगल कॉलनी, सांगली) येथे भेट, बीएलओ व मतदारांशी चर्चा. रात्री शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम व राखीव. बुधवार दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह सांगली येथून उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूरकडे प्रयाण. 00000

जत तहसील कार्यालयात 21 सप्टेंबरला लोकशाही दिन

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : तहसील कार्यालय जतच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकशाही दिन आयोजित केला आहे. शासन परिपत्रकानुसार सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणी यांचे न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार, 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जत तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी, जत उपविभाग यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाची बैठक घेण्यात येणार असल्याचे जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावयाचे आहे, त्या अर्जदारांनी नियोजित बैठकीपूर्वी विहित नमुन्यात दोन प्रतींत अर्ज तहसील कार्यालय, जत येथे जमा करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांवर संबंधित विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी 11 नोव्हेंबरला परीक्षा

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : राज्यातील दिनांक 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची (कोतवाल) रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. सांगली जिल्ह्यात महसूल सेवकांची एकूण 354 पदे असून 287 पदे भरलेली आहेत, तर 67 पदे रिक्त आहेत. या पदभरतीची प्रक्रिया निश्चित कालबद्ध कार्यक्रमानुसार 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्याचे निर्देश महसूल व वन विभागाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोतवाल परीक्षा 2026 च्या कार्यक्रमानुसार तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनविण्याचा कालावधी 2 ते 8 सप्टेंबर 2026, रिक्त जागेनुसार बिंदू नामावली तयार करणे 9 ते 23 सप्टेंबर 2026, परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना 24 सप्टेंबर 2026, जाहिरातीचा दिनांक 2 ऑक्टोबर 2026 (गांधी जयंती) ते 17 ऑक्टोबर 2026. अर्जांची छाननी 18 ऑक्टोबर 2026 ते 1 नोव्हेंबर 2026, प्रवेशपत्र उपलब्ध 4 ते 10 नोव्हेंबर 2026, परीक्षा दिनांक 11 नोव्हेंबर 2026, उत्तरसूची आणि निकाल घोषणा 12 नोव्हेंबर 2026, दस्तऐवज पडताळणी 13 ते 27 नोव्हेंबर 2026, नियुक्तीपत्र 28 नोव्हेंबर 2026 00000

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन - कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : कारागृहातील बंद्यांचे माणूस म्हणून पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांच्या मनपरिवर्तनासाठी नातेवाईकांशी संवाद महत्त्वाचा असून, मुलाखत कक्षाच्या माध्यमातून त्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. कारागृहात असे सुधारणात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासकीय निधी तसेच सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून तरतूद करू, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. सांगली जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी बांधलेल्या नवीन मुलाखत कक्षाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, पालमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कारागृह अधीक्षक विजय कांबळे, कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हणमंत नलवडे, नगरसेविका स्वाती शिंदे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अरूण मदने, तुरूंगाधिकारी माधुरी मोरे आदि उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसाच्या हातून अनावधानाने झालेल्या अपराधासाठी त्याला त्याच्या स्वजन व नातेवाईकांपासून दूर राहणे हीच मोठी शिक्षा असते. पश्चात्तापदग्ध कैद्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी तसेच त्यांच्या मनपरिवर्तनासाठी अनेक उपक्रम कारागृह प्रशासनाकडून राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष करण्यात आला आहे. नातेवाईकांशी संवाद साधून बंद्यांचे मनपरिवर्तन होऊ शकते. त्यांना चांगले जीवन जगण्याची उमेद मिळू शकते, असे ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मनपरिवर्तन होऊन चांगल्या वर्तणुकीमुळे किंवा अन्य कारणाने शिक्षेत सूट मिळालेल्या बंद्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना माणूस म्हणून चांगले जीवन व्यतीत करता यावे म्हणून शासन अनेक सकारात्मक उपक्रम राबवत आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकासाचे धडे त्यांना देण्यात आले असून, कारागृहातील मूलभूत सोयी सुविधांसाठी आवश्यक निधी सदैव उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाला भेट देऊन पाहणी केली. मुलाखत कक्षाचे उद्‌घाटन सांगली जिल्हा कारागृह येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष बांधण्यात आला आहे. यामध्ये एका वेळी 10 कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येणार आहे. यासाठी 62 लाख रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. न्यायाधीन बंद्यांना आठवड्यातून एक दिवस व शिक्षाधीन बंद्यांना पंधरा दिवसातून एक वेळेस नातेवाईकांसोबत भेट देण्यात येते. या मुलाखत कक्षामुळे बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटण्यास सुसज्ज मुलाखत कक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आले आहेत. बंद्यांना व बंद्यांच्या नातेवाईकांना व त्यांच्या वकिलांना प्रत्यक्ष भेटीवेळी या मुलाखत कक्षातून संवाद साधता येणार आहे. बंद्यांची नातेवाईकांबरोबर समक्ष भेट झाल्याने त्यांचा ताणतणाव कमी होऊन, गुन्हेगारीपासून दूर जाण्यासाठी त्यांची मानसिकता तयार होण्यासाठी मदत होते. प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वाटप जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सांगली यांच्यावतीने कारागृहातील एकूण 81 बंद्यांना संगणक डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले गेले. ते सर्व या डाटा एन्ट्री परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी 66 बंदी जामीनवर मुक्त झाले आहेत. सध्या कारागृहात 15 बंदी बंदिस्त असून त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. बंदी कारागृहातून मुक्त झाल्यानंतर सदर सर्टीफिकेटचा व कोर्सचा त्यांना नवीन आयुष्य जगण्याकरिता उपयोग होईल व देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्यास प्रोत्साहन मिळेल. 00000