मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६
दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी मिरज आगारातून जादा बसेस
सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज आगाराने विशेष नियोजन केले आहे. दि. 1 ते 22 नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज आगारातून विविध मार्गांवर ३२ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बससेवेचा लाभ घेताना नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी उपलब्ध आरक्षण सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मिरज-पुणे, मिरज-छत्रपती संभाजीनगर, मिरज-नांदेड, मिरज-लातूर, मिरज-तुळजापूर आणि मिरज-नाशिक या मार्गांवर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावरही जादा वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा