शुक्रवार, ८ जून, २०१८

‘“Ö»ÖÖ ¯ÖµÖÔ™ü­ÖÖ»ÖÖ’ प्रदर्शन वारसा, इतिहास, संस्कृती यांचे मिश्रण - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

सांगलीकरांसाठी रविवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार

  सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : “Ö»ÖÖ ¯ÖµÖÔ™ü­ÖÖ»ÖÖ या पर्यटनस्थळांच्या छायाचित्र प्रदर्शनातून आपला वारसा, इतिहास, संस्कृती यांचे एकत्रित मिश्रण मांडण्यात आले आहे. सांगलीकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सफर आवर्जून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले.
येथील कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक समितीच्या प्रदर्शन दालनामध्ये आयोजित चला पर्यटनाला या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री विजयकुमार शहा, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, डॉ. सई लळित, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सांगली जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तुंचे सौंदर्य, त्यांचा इतिहास या छायाचित्रांमधून उलघडला गेला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा ऐतिहासिक स्थळे, स्मारके, अप्रतिम दऱ्याखोरी, मंदिरे यातून इतिहासाचे स्मरण घडते. याबरोबरच देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गमधीलही अनेक पर्यटनस्थळे पाहणाऱ्याचे मन मोहून घेत आहेत.
'चला पर्यटनाला' हा माहिती विभागाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, या प्रदर्शनाच्या निर्मितीमध्ये अथक मेहनत आणि कष्ट घेतले असून जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळांची देखणी, सुबक छायाचित्रे संक्षिप्त माहिती आणि आकर्षक टॅगलाईन देण्यात आली आहे. या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ठिकाणे, माहिती लोकांना होईल आणि पर्यटनासाठी सहाय्यभूत ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रदर्शनाच्या देखण्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रदर्शन जिल्ह्याबरोबरच तालुकास्तरावरही आयोजित करण्याचे सूचित केले.
माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी या प्रदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, चला पर्यटनाला हे छायाचित्र प्रदर्शन 8 ते 10 जून 2018 या कालावधीत मोफत खुले ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 50 पर्यटनस्थळांच्या अशा 150 छायाचित्रांची मांडणी केली आहे. या छायाचित्र प्रदर्शनामध्ये 'ऐतिहासिक कोल्हापूर', 'सांगली, बहु चांगली' तर 'रमणीय सिंधुदुर्ग' अशी  संकल्पना राबवून कोल्हापूर विभागातील 150 निवडक ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्राचे अनुरुप शब्दात वर्णन करण्यात आले आहे.
 जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत केले. तर माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी आभार मानले.
पर्यटनस्थळांची सफर
हे प्रदर्शन दि. 8 ते 10 जून या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत मोफत खुले राहणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातर्फे आयोजित या प्रदर्शनात कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 50 पर्यटनस्थळांच्या अशा 150 छायाचित्रांचा समावेश आहे.
या प्रदर्शनामध्ये सांगली जिल्ह्यातील श्री गणेश मंदिर, बलवडी येथील क्रांतीवन, सागरेश्वर अभयारण्य आणि मंदिर, राजेवाडीचा ऐतिहासक तलाव,  तासगावचा रथोत्सव, कडेगावचा मोहरम, हरिपूर संगम, स्मारके, स्वतंत्रपूरचे खुले कारागृह शिराळ्याची नागपंचमी, यशवंतराव चव्हाण, ग. दि. माडगूळकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, रेवणसिद्ध मंदिर तर कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, राजर्षि शाहू महाराज जन्मस्थळ, रंकाळा तलाव, तिलारी येथील स्वप्नवेल पॉइंट, सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर, नृसिंहवाडी, आजरा येथील रामतीर्थ आदि आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नयनरम्य सागरकिनारे, खाद्यसंस्कृती, मंदिरे आदिंची मांडणी छायाचित्रांमधून करण्यात आली आहे.
00000




रविवार, ३ जून, २०१८

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र वार्षिकी 2018 पुस्तकाचे प्रकाशन

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : माहिती जनसंपर्क महासंचालनालय निर्मित महाराष्ट्र वार्षिकी 2018 चे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि उपस्थित होते.
   महाराष्ट्र वार्षिकी या पुस्तकाचे संदर्भ मुल्य मोठे आहे. हे एक उत्तम संदर्भ पुस्तक असून, प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांच्या संग्रही असावा अशी प्रतिक्रीया पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी दिली.
   महाराष्ट्र वार्षिकी या पुस्तकात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती अद्ययावत आकडेवारीसह देण्यात आली आहे. या पुस्तकाची किंमत 250 रूपये आहे. हे पुस्तक जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2602059 येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

00000

बँकांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ गरजूंना द्यावा - पालकमंत्री सुभाष देशमुख

- जिल्हा मुद्रा समन्वय समितीची बैठक संपन्न

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : सामान्य नागरिकांना इच्छा असूनही आर्थिक सहाय्याअभावी अनेकदा व्यवसाय, उद्योग सुरू करता येत नाहीत. त्यामुळे अशांच्या मदतीसाठी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. या योजनेचा लाभ गरजू, वंचित आणि तळागाळातील जनता तसेच, नवउद्योजकांना द्यावा, असे निर्देश सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मुद्रा समन्वय समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य-सदस्या आणि सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
बँकांच्या उदासीनतेमुळे अनेक इच्छुक तरूण प्रधानमंत्री मुद्रा योजनाच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि मुद्रा बँक योजनेतून कमाल 10 लाख रुपये मर्यादेत कर्ज दिले जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 10 लाख रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ केले जाते. त्यामुळे या दोन्ही योजनांची सांगड घालून सांगली जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, यासाठी बँकांनी मनापासून प्रयत्न करावेत. आतापर्यंत कर्ज दिलेल्या नवीन लाभार्थींची यादी बँकेच्या शाखानिहाय दर्शनी भागात प्रदर्शित करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते, असे स्पष्ट करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आपल्या सांगली जिल्ह्यात उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरूण आहेत. मात्र, त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग, व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. भांडवलाची उपलब्धता, कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा यांचा विचार करून तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने मुद्रा बँक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अशा तरूणांना मुद्रा योजनेतून कर्ज देऊन बँकांनी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचाही घेतला आढावा
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत एकरकमी परतफेडी (ओटीएस) योजनेतील लाभार्थ्यांसाठी 30 जून 2018 अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच याकामी बँकानीही स्वत:हून पुढाकार घेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी योजनेचा लाभ द्यावा, असे ते म्हणाले.
   यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी या योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा मांडला.
00000