शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 32.2 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.61 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 7.1 (314.7), तासगाव 4.3 (294.3), कवठेमहांकाळ 3.9 (361.9), वाळवा-इस्लामपूर 5.6 (345.9), शिराळा 32.2 (798.6), कडेगाव 3.4 (298.2), पलूस 2.8 (248.2), खानापूर-विटा 3.4 (402.8), आटपाडी 0.0 (253.0), जत 0.3 (207.5).
00000
जिल्ह्यातील वारणा धरणात 29.44 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 08 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.44 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 71.56 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.49 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 8.03 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.71 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 21.57 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 95.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 6500 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 4100 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स, कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स व अलमट्टी धरणातून 1 लाख 80 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 10.4 (45), आयर्विन पूल सांगली 22.7 (40) व अंकली पूल हरिपूर 29.6 (45.11).
00000
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 45.5 मि. मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.91 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 45.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.5 (307.6), तासगाव 3.4 (290), कवठेमहांकाळ 2.3 (358), वाळवा-इस्लामपूर 9.5 (340.3), शिराळा 45.5 (766.4), कडेगाव 7.6 (294.8), पलूस 1.0 (245.4), खानापूर-विटा 4.0 (399.4), आटपाडी 0.0 (253.0), जत 2.4 (207.2).
00000
जिल्ह्यातील वारणा धरणात 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 07 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 69.12 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.63 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 7.73 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.53 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 21.05 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 97.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 4400 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 7112 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 1000 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स व कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 11.5 (45), आयर्विन पूल सांगली 23.9 (40) व अंकली पूल हरिपूर 29.6 (45.11).
00000
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०
जिल्ह्यात 75 पूरप्रवण गावांना आपत्ती किटचे वाटप
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 104 पूरप्रवण गावे आहेत. या गावामध्ये आपत्कालीन साहित्य (आपत्ती किट) वाटप करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला होता. जिल्ह्यात मिरज तालुक्यात 20, पलूस 25, वाळवा 38 व शिराळा तालुक्यात 21 अशी एकूण 104 पूरप्रवण गावे आहेत. त्यानुसार प्राधान्याने एकूण 75 पूरप्रवण गावांना साहित्य खरेदी करण्यात आलेले असून त्याचे आज पूरप्रवण तालुक्यांना वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली.
प्रत्येक आपत्कालीन किटमध्ये मेगा फोन, रोप, बॅग, टॉर्च, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे साहित्य आहे. मिरज तालुका 17, वाळवा 31, पलूस 21 व शिराळा तालुक्यास 06 असे एकूण 75 आपत्कालीन साहित्याच्या किटचे आज वाटप करण्यात आले. यापूर्वी सर्व गावांचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एन.डी.आर.एफ. ची दोन पथके (50 जवान) 15 जुलै पासून दाखल झालेली असून आष्टा व सांगली येथे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन चार बोटी खरेदी करण्यात आलेल्या असून पलूस तालुक्यास 2 व वाळवा तालुक्यास 2 असे वाटप करण्यात आलेले आहे.
000000
गुरुवार, ३० जुलै, २०२०
कर्तव्यावर हजर न होणाऱ्या ८ जणांवर मेस्मा अंतर्गत कारवाई
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल
हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केले होते. यामध्ये ज्यांनी आदेशाचे
पालन केले नाही अशा ८ जणांवर मिरज पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे.
सद्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य
विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस
ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका
हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून
शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सांगली
मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी
हॉस्पीटल हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत
निर्देशित केले आहे.
पुजा कलाब, योगेश सुहास आवळे, केतन सोन्याबापू
कांबळे, केतन सुर्यवंशी, ज्योती आप्पासो कांबळे, श्वेता धोंडीराम भाट, ऋषीकेश पाटील,
पुजा भोसले यांच्याविरूध्द मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)