बुधवार, १३ एप्रिल, २०२२
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 18 एप्रिलला
सांगली, दि. 13 (जि. मा.का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. माहे एप्रिल 2022 महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि. 18 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.
00000
औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा 21 एप्रिलला
सांगली, दि. 13 (जि. मा.का.) : राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण, एमएसबीव्हीइ उत्त्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली चे प्राचार्य यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी आयटीआय पास गुणपत्रक छायांकित प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत, आयटीआय प्रमाणपत्र छायांकित प्रत या कागदपत्रांच्या 2 प्रतिसह उपस्थित रहाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
00000
गुरुवार, ७ एप्रिल, २०२२
ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांसाठी 190 कामांसाठी 24 कोटी 5 लाखाचा निधी
ी
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने बांधकाम विभागासाठी सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 190 कामांसाठी 24 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुचविलेली असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
सदरची कामे सन 2021-22 या आर्थिक वर्षातील असून ती 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये विविध ग्रामीण क्षेत्रातील गावांत सभागृह बांधणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्ते सुधारणेंतर्गत डांबरीकरण, खडीकरण, मुरमीकरण व काँक्रीटीकरण करणे, जोड रस्ते सुधारणे, ग्राम सचिवालय बांधणी, संरक्षक भिंत बांधणे, व्यायाम शाळा बांधणे, धार्मिक स्थळांचा विकास, सांस्कृतिक भवन बांधणे, स्मशान भूमी बांधकाम व सुशोभिकरण आदि कामांचा समावेश आहे.
00000
सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना
त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी 31 मार्च 2022 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करण्यास भाग पाडणे) अधिनियम 1959 नुसार रिक्तपदे कळविण्याबाबत व तिमाही विवरणपत्र ईआर-1 मध्ये मनुष्यबळाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे. सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे दि. 31 मार्च 2022 अखेरच्या तिमाहीचे विविरणपत्र ईआर-1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन सादर करावे. अधिक माहितीसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
०००००
बुधवार, ६ एप्रिल, २०२२
समता कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच योजनांचे उद्देश साध्य व्हावेत याकरीता दि. 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये समता कार्यक्रमातंर्गत दि. 6 ते 16 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीक, लोकप्रतिनिधी, शासकिय कर्मचारी, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त व जिल्हा परीषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये समता कार्यक्रमातंर्गत दि. 6 ते 16 एप्रिल या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 एप्रिल - सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन, दि. 7 एप्रिल - सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकिय वसतिगृह, निवासी शाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इ. आयोजन, दि. 8 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली येथे स्वाधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना शिष्यवृत्तीचे प्रतिनिधीक वाटप. दि. 9 एप्रिल - सांगली जिल्ह्यात जेष्ठ नागरीकांचे जनजागृती शिबीर व नागरीकांच्या मेळाव्याचे आयोजन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली व जिल्ह्यातील महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह व निवासी शाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन, दि. 10 एप्रिल - समतादुतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटीका याव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन, दि. 11 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी करुन महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन, दि. 12 एप्रिल - सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली येथे मार्जिन मनी योजनेंतर्गतच्या कार्यशाळेचे आयोजन, दि. 13 एप्रिल - समतादुतामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान जागर - संविधान जनजागृतीसाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन, दि. 14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय वसतिगृहे, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम तसेच व्याख्यान, चर्चासत्राचे आयोजन. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात ऑन लाईन व्हॅलिडेटी प्रमाणपत्र प्रदान करणे या कार्यक्रमाचे आयोजन, दि. 15 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे महिला मेळाव्याचे आयोजन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन तसेच तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन. दि. 16 एप्रिल - जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यामध्ये स्वच्छता कार्यक्रम व अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार लाभार्थ्यांचे मनोगत कार्यक्रम आणि समता कार्यक्रम समारोप.
00000
खाजगी दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका सोमवार पासून सुरू
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या खाजगी दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 डी डब्ल्यु ही नवीन मालिका सोमवार, दि. 11 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
एम एच 10 डी डब्ल्यु या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनासाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या ठिकाणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत - आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 12 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
00000
सोमवार, ४ एप्रिल, २०२२
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 10 कोटी 35 लाखाचा निधी; 7 कोटीहून अधिक वितरीत - सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून शासनाने सांगली जिल्ह्यासाठी 10 कोटी 35 लाख रूपये कामांच्या अंदाजित रक्कमेस प्रशासकीय मंजुरी दिली असून 7 कोटी 24 लाख 50 हजार रूपये इतका निधी वितरीत केला आहे. अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
विविध गावातील कामांसाठी तालुकानिहाय मंजूर निधी व कंसात वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे. कडेगाव - 1 कोटी 20 लाख (84 लाख), पलूस - 75 लाख (52 लाख 50 हजार), जत - 75 लाख (52 लाख 50 हजार), शिराळा - 10 लाख (7 लाख), तासगाव - 70 लाख (49 लाख), कवठेमहांकाळ - 50 लाख (35 लाख), खानापूर - 93 लाख (65 लाख 10 हजार), आटपाडी - 42 लाख (29 लाख 40 हजार), मिरज - 1 कोटी 30 लाख (91 लाख), वाळवा - 3 कोटी 50 लाख (2 कोटी 45 लाख) तर महानगरपालिका क्षेत्रासाठी - 20 लाख (14 लाख) रूपये. या निधीतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधांमध्ये वाढ होईल.
00000
शुक्रवार, १ एप्रिल, २०२२
जलशक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी 5 एप्रिलला विशेष ग्रामसभा घ्या 15 एप्रिल पर्यंत जिल्ह्याचा आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत असून पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुर्नसंचयित करणे या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे. जलशक्ती अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश होता त्यामध्ये जिल्ह्याने अत्यंत चांगले काम केले आहे. आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येवून गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हास्तरावर येत्या सहा महिन्यांत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा विहीत कालमुदतीत तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांनी जलशक्ती अभियानामध्ये जिल्हा चमकदार कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे जलशक्ती अभियान हाती घेण्यात आले असून राज्य सरकारही यामध्ये सहभागी आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपवनसंरक्षक विजय माने, अतिरिक्त आयुक्त डी. जी. लांघी, जिल्हा जलसंधारण अधिकारी डी. एस. साहुत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेंद्र काटकर व अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे सुनिल पाटील आदि उपस्थित होते.
पावसाचे पडणारे पाणी अडविणे, जिरविणे आणि वाचविणे हा उपक्रम लोकसहभागाशिवाय होवू शकत नाही. त्यामुळे जलशक्ती अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विविध शासकीय यंत्रणा यांनी एकसंघ होवून एकदिलाने काम करावे आणि हे अभियान जनचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. जलशक्ती अभियानाची समाजातील सर्व घटकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, त्यांचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घ्यावी. यामध्ये जलशपथ घेण्यात यावी, लोकांना या योजनेची माहिती द्यावी, गावपातळीवर करावयाचा कामांचा आराखडा तयार करावा. यामध्ये जिल्हा परिषद यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच जलशक्ती अभियानाशी संबंधित यंत्रणांनी गावनिहाय, तालुकानिहाय करावयाच्या कामांचा आराखडा 10 एप्रिल पर्यंत तयार करावा व तो जलसंधारण अधिकारी यांच्याकडे द्यावा. 15 एप्रिल पर्यंत जिल्हा आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 2019 पूर्वी जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांचे जिओ टॅगींग पुन्हा करावयाची गरज नसून 2019 नंतर झालेल्या कामांचे जिओ टॅगींग करून ती पोर्टलवर अपलोड करावीत, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
वृक्षारोपण, रेनवॉटर हार्वेस्टींग, सुक्ष्म जलसिंचन, जलसंधारण, मृद संधारण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, वनतळी आदि वेगवेगळ्या कामांना एकसंघ करून पुढील सहा महिन्यात करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरी भागातही पाण्याचा पुर्नवापर आणि संरचनेचे पुनर्भरण, सघन वृक्षारोपन, रेनवॉटर हार्वेस्टींग आदि कामांना माझी वसुंधरा अंतर्गत प्राधान्य द्यावे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करावी. यावेळी त्यांनी जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते सर्व नियोजन करावे, असे निर्देश दिले.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)