मंगळवार, ३० एप्रिल, २०२४
टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील (शासकीय) अधिकारी/कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राव्दारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
44-सांगली लोकसभा मतदार संघात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 1502 व दिव्यांग 295 मतदारांचे गृहभेटीव्दारे मतदान करून घेतले जाणार आहे. या मतदारांचे मतदान दि. 1, 2 व 3 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे.
44-सांगली लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंद असलेल्या आणि सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यप्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर सांगली लोकसभा मतदार संघाबाहेर जे अधिकारी/कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांना विधानसभा मतदार संघस्तरावर सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन 2 ते 4 मे 2024 या कालावधीत मतदान करता येणार आहे.
00000
स्वीप अंतर्गत जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे 2 मे रोजी आयोजन
सांगली, दि. 30 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृती करिता निमंत्रित टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रत्येक तालुकास्तरावरील तालुका क्रीडा संकुलामध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात आलेले होते. दिनांक २ मे रोजी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आझाद चौक सांगली या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील तालुकास्तर टेनिस क्रिकेट स्पर्धेमधील विजयी संघांनी दिनांक २ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
स्पर्धे दरम्यान तालुकास्तरावरील विजयी संघाना आकर्षक ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघाना देखील आकर्षक ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ दी मॅच व मॅन ऑफ दी सिरीस, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना देखील ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तालुका निहाय विजयी संघांनी दि २ मे रोजी सकाळी ठीक ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आझाद चौक सांगली या ठिकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
00000
सोमवार, २९ एप्रिल, २०२४
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आज मुलाखत
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी ही मुलाखत घेतली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही, मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती दिली आहे.
०००००
मतदान प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची - जनरल निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी अधिक जागरूक व दक्ष राहून आपले निवडणूक कर्तव्य बजावावे, अशा सूचना जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात आज निवडणूक जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म निरीक्षकांची बैठक झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्च असलेल्या मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या मतदारांचे मतदान होताना आणि 7 मे रोजीच्या मतदान दिवशी सूक्ष्म निरीक्षकांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निर्भयपणे पार पाडावी अशा सूचना निवडणूक जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी दिली. उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी सादरीकरणाद्वारे सूक्ष्म निरीक्षकांन माहिती दिली.
०००००
शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४
निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची - निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.
निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात दि.7 मे 2024 रोजी मतदान होत असून निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदारचा सहभाग असावा, यासाठी यंत्रणेने सुयोग्य नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी,अशा सूचना सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी आज दिल्या.
44-सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामाकाजा आढावा सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी, निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक संदिप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सावली, पुरेसा वीज पुरवठा यासह अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य द्यावे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करावी. गरज भासल्यास दिव्यांग मतदारांना मदतनीसाची सेवाही उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 44-सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली, यामध्ये मतदान केंद्रावरील सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम, व्होटर हेल्पलाईन, सीव्हीजील ॲप, कायदा सुव्यवस्था याबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.
000000
गुरुवार, २५ एप्रिल, २०२४
44- सांगली लोकसभा मतदार संघात टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील (शासकीय) अधिकारी/कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राव्दारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
44-सांगली लोकसभा मतदार संघात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 1502 व दिव्यांग 295 मतदारांचे गृहभेटीव्दारे मतदान करून घेतले जाणार आहे. या मतदारांचे मतदान दि. 1, 2 व 3 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे. तर अत्यावश्यक सेवेतील 6 मतदारांचे मतदान जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षात 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत होणार आहे.
44-सांगली लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंद असलेल्या आणि सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यप्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर सांगली लोकसभा मतदार संघाबाहेर जे अधिकारी/कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांना विधानसभा मतदार संघस्तरावर सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन 2 ते 4 मे 2024 या कालावधीत मतदान करता येणार आहे.
00000
राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे - निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान होत असून राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जनरल निरिक्षक परमेश्वरम बी. यांनी केले.
आदर्श आचारसंहिता संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधी व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समवेत बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे आदी उपस्थित होते.
जनरल निरिक्षक परमेश्वरम बी. यांनी सांगितले, सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक निर्भय, भयमुक्त वातावरणात होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. आदर्श आचार संहितेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
प्रचारासाठी आवश्यक परवानग्या घ्या... जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
44-लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रचारासाठी वाहन, सभा, रॅली, प्रचार साहित्य, ऑडिओ, व्हिडिओ, प्रमाणीकरण यासह आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित कक्षाकडून घ्याव्यात. या परवानगीसाठी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत केले. handbill, pamphlet, manifesto यांची छपाई करताना त्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नमूद करणे आवश्यक आहे. याबाबत आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, उमेदवाराने प्रत्येक दिवसाचा खर्च विहित नमुन्यात खर्च विषयक समितीस सादर करावा. खर्च सादर करण्यासाठी प्रतिनिधीची नेमणूक करावी. प्रचारात लहान मुलांचा सहभाग करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आदर्श आचारसंहिता व निवडणूक प्रचार कालावधीत काय करावे आणि काय करू नये याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)