सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

अंधश्रद्धांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात वाघेश साळुंखे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विटा येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलांचे शासकीय वसतिगृह आणि शासकीय निवासी शाळा, विटा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारिणी सदस्य वाघेश साळुंखे यांनी विविध प्रात्यक्षिके व प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. समाजामध्ये प्रचलित असलेल्या विविध अंधश्रद्धांमागील वास्तव विद्यार्थ्यांना प्रयोगांच्या माध्यमातून समजावून सांगत, कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारसरणी आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती अंगीकारल्यास अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. समतादूत लता सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय निवासी शाळा, विटा येथील शिक्षिका श्रीमती निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले. यावेळी शासकीय निवासी शाळा, विटाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसले, शिक्षिका श्रीमती निकम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह, विटा च्या अधीक्षिका रत्नमाला जाधव, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कर्मचारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा