शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
#सेवासंकल्पअभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली
#सेवासंकल्पअभियान
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली
#सेवासंकल्पअभियान आष्टा अप्पर तहसिल कार्यालय व आष्टा सेतू कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आष्टा शहरात व्हीजे/एनटी दाखले वाटप कॅम्प घेण्यात आला
#सेवासंकल्पअभियान
आष्टा अप्पर तहसिल कार्यालय व आष्टा सेतू कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आष्टा शहरात व्हीजे/एनटी दाखले वाटप कॅम्प घेण्यात आला
#सेवासंकल्पअभियान आष्टा अप्पर तहसिल कार्यालय व आष्टा सेतू कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आष्टा शहरात व्हीजे/एनटी दाखले वाटप कॅम्प घेण्यात आला
#सेवासंकल्पअभियान
आष्टा अप्पर तहसिल कार्यालय व आष्टा सेतू कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आष्टा शहरात व्हीजे/एनटी दाखले वाटप कॅम्प घेण्यात आला
सांगलीत 'स्वच्छता हीच सेवा' अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
#सेवासंकल्पअभियान
सांगलीत 'स्वच्छता हीच सेवा' अंतर्गत सांगली,मिरज कुपवाड शहर महानगरपालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्यासह हजारो शालेय विद्यार्थ्यांच्या सह सरकारी घाट परिसराची स्वच्छता केली.
#सेवासंकल्पअभियान
#सेवासंकल्पअभियान
वाटेगाव येथे सेवा संकल्प सच्छता हीच सेवा अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
सांगली जिल्ह्यात मिशन सुधार, ई-केवायसी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीत 83.6 टक्के काम पूर्ण - वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, सदोषरहित आणि गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ व ई-केवायसी अभियानाला उत्तम यश मिळत असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात ई-केवायसीचे ८३.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
जिल्हा प्रशासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुकानिहाय ई-केवायसी पूर्णतेची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. वाळवा ८६.५४ टक्के, कवठेमहांकाळ ८४.७३ टक्के, मिरज ८४.५८ टक्के, जत ८४.३४ टक्के, विटा-खानापूर ८३.७९ टक्के, सांगली ८२.७५ टक्के, तासगाव ८२.७१ टक्के, पलूस ८२.५१ टक्के, कडेगाव ८३.०६ टक्के, शिराळा ७९.६९ टक्के आणि आटपाडी ७९.२५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
‘मिशन सुधार’ अंतर्गत रास्त भाव दुकाने व शिधापत्रिका व्यवस्थापनाशी संबंधित माहिती शासनाकडून पुरविण्यात आली आहे. यामध्ये Gross Turnover (उलाढाल), Income Group (उत्पन्न गट), Individual as Director (संचालक म्हणून व्यक्ती), PFMS व Postal Services आदी निकषांच्या आधारे पात्र व अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येत आहे. अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना शुभ्र शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
‘GIVE IT UP’ अभियानांतर्गत उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी अन्न सुरक्षा योजनेतून स्वतःहून नाव कमी करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचा कारभार अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासाठी महसूल व पुरवठा यंत्रणा कटिबद्ध आहे. ज्या तालुक्यांमध्ये काम प्रलंबित आहे, तेथील अधिकाऱ्यांना हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित काम निश्चित मुदतीत पूर्ण करून सांगली जिल्ह्याला १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे नेण्याचे ध्येय पुरवठा विभागाने ठेवले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000
पीकपंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता यंत्रणांना सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
- आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, धावडवाडी येथे पिकांची पाहणी
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार यावर्षी आटपाडी तालुक्यात खरीप हंगाम २०२६ साठीची कळ एक लागू झाली असून, दुष्काळी परिस्थितीमध्ये शासनाच्या आदेशानुसार महसूल, कृषी व अन्य संबंधित यंत्रणा जलद गतीने कार्यवाही करत आहे. ही कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी शेतकरी बांधवांनी यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज केले.
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, धावडवाडी येथे दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार शितल बंडगर, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बाधित खातेदार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, शासनाच्या सूचनेप्रमाणे १० दिवसात पीक पंचनाम्याचे काम पूर्ण करायचे आहे. मात्र इथे काही स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे विविध कागदपत्रांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यांना अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन करून त्यांनी शेतकऱ्यांनी फक्त आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स आणि फार्मर आयडी एवढीच कागदपत्रे द्यायची असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याला वैयक्तिक काहीच करायची गरज नसून, पीकपंचनाम्याची सर्व कार्यवाही शासकीय यंत्रणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सद्यस्थितीत आटपाडी तालुक्यामध्ये पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडले गेले आहे. त्याच्यामुळे तालुक्यात फक्त 5 टँकर चालू आहेत. मागणीनुसार टँकरमंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून नागरिक व जनावरांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चारा कमतरता भासू नये या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)