सांगली,
दि. 14, (जि. मा. का.) : सांगली
जिल्ह्यात आलेल्या महापुराने सर्वसामान्याबरोबरच उद्योग जगतालाही मोठा फटका बसला
आहे. अशावेळी एकमेकांना सहाय्य करुन धीर देण्यासाठी विविध संस्था दानशूर व्यक्ती
पुढे येत आहेत. पूरबाधितांसाठी राज्यभरातून जिल्हा प्रशासनाकडे मदतीचा ओघ सुरु
आहे.
आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी यांच्यामार्फत 7 लाख 50 हजारांचा, श्रीमती
राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट, राजमती भवन, नेमिनाथ नगर, सांगली यांच्याकडून 5 लाख
रुपये, आदगोंडा बाबगोंडा पाटील यांच्याकडून 5 लाख रुपये, चारुभाई शहा इंडिस्ट्रीयल
डेव्हलोपमेंट ॲण्ड रिसर्च ट्रस्ट सांगली यांच्याकडून 2 लाख 50 हजार रुपयांचा
धनादेश प्रधान करण्यात आला. निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी देण्यात आला आहे. याशिवाय हेमलता दत्तात्रय पुजारी यांच्या 10 हजार
रुपये, लेप्रसी रिहाबिलीटेशन सेटर मेकर्स भाईवाडी मिरज यांच्याकडून 11 हजार रुपये,
एम. बी. ट्रेडर्स चे निता अनिल भंडारे मिरज यांच्याकडून 5 हजार 11 रुपये, सरितादेवी
आप्पासाहेब गतारे यांच्याकडून 5 हजार असा निधी मुख्यमंत्री सहायता निधी जमा झाला
आहे.
एस.एम.जे.आय. ट्रस्ट श्रवणबेळगोळा यांच्यावतीने
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये
10 लाख रुपये
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर
परिस्थिती पाहण्यासाठी व समाजातील सर्वांना मदत करण्यासाठी श्रवणबेळगोळा येथील प पु
जगतगुरु चारुकीर्ती भटारक महास्वामी यांनी सांगली शहर व परिसराची पाहणी केली. त्यांनी
नवीन धामणी, पत्रकार नगर, वखार भाग, अंकली आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन एस.एम.जे.आय. ट्रस्ट श्रावणबेलगोला यांच्या
वतीने मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी रुपये
10 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच स्वामीजींनी जिल्ह्यातील इतर संस्थांनाही 15
लाख रुपयांची मदत जाहीर केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, संपादक दिलीप
पाटील उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा