सांगली,
दि. १४, (जि. मा. का.) : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दिनांक 13 ऑगस्ट
रोजी विविध ठिकाणच्या 16 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त
जनतेला माफक दरात दुधाची व्रिी करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक
वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यत
आल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने न विकल्यास
आस्थापना सील केल्या जातील, असा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.
ही कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले यांच्या
मार्गदर्शनाखाली द. ह. कोळी, सु. मा.
दांगट, र. ल. महाजन, अ. भु. कोळी, श्रीमती मे. स. पवार, सु. स. हाके, नमुना
सहाय्यक तानाजी कवळे यांनी केली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा