सांगली,
दि. 15, (जि. मा. का.) : शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सांगली येथे पूरग्रस्त कुटुंबियांचे फ्रीज
तपासणी व किरकोळ दुरूस्ती, वेल्डिंग, सुतारकाम, इलेक्ट्रीक फिटींग तपासणे,
पाण्याखाली गेलेल्या नादुरूस्त पाण्याच्या मोटारी तपासणी करून दुरूस्ती करून देणे
इत्यादी कामे मोफत करून देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी इच्छुक लोकांनी
आयटीआयचे शिल्पनिदेशक उमेश लोहार मो. नं. 9421113321 व संजय यादव 7020013334
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य यतिन पारगांवकर यांनी केले
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा