सांगली,
दि. 14, (जि. मा. का.) : महापुरात
सांगलीचे अपरिमित नुकसान झाले. कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे
सांगलीसह जिल्ह्याच्या 4 तालुक्यात अपरिमित हानी झाली. या पार्श्वभूमिवर
पूरबाधितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली
जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मदतीचे आवाहन केले. त्याला
सोलापूरवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या पार्श्वभूमिवर हरिपूरचे सरपंच विकास
हणबर यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे आभार मानले. ते म्हणाले, आमच्या या
गावाच्या अडचणीच्या काळात गाव दत्तक घेऊन व सोलापुरातून लोकांना या ठिकाणी मोठ्या
प्रमाणावर मदत आली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आमच्या गावात येऊन,
स्वच्छता अभियानात हातभार लावत आहेत. यामुळे आज आम्हाला खूप मोठा आधार मिळाल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले.
00000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा