सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती
हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे
सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण
104 पूरबाधित गावांतील सुमारे 34 हजार 917 कुटुंबांतील 3 लाख, 11 हजार 485 लोक व 42
हजार 494 जनावरे यांचे विस्थापित झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत
चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले,
11 हजार 34 कुटुंबातील 49 हजार 530 व्यक्ती आणि 16 हजार 363 जनावरे यांचे
प्रशासकीय कँपमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. 23 हजार 883 कुटुंबातील 1 लाख 24
हजार 955 व्यक्ती आणि 26 हजार 131 जनावरे हे नातेवाईक व स्वतःच्या सोयीनुसार
विस्थापित झाले आहेत. सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 37
हजार व्यक्ती नातेवाईक व स्वतःच्या सोयीनुसार विस्थापित झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले,
महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 881 कुटुंबांतील 15 हजार 522 लोक व 720 जनावरे
यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 37 हजार व्यक्ती
नातेवाईक व स्वतःच्या सोयीनुसार विस्थापित झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले,
पूरबाधित अन्य चार तालुक्यातील विस्थापितांची संख्येत बदल झाला नाही. मिरज
तालुक्यातील 20 गावांतील 10 हजार 476 कुटुंबांतील 52 हजार 514 लोक व 12 हजार 661
जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25
गावांतील 7 हजार 651 कुटुंबांतील 37 हजार 720 लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे
तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12
हजार 256 कुटुंबांतील 65 हजार 547 लोक व 15 हजार 135 जनावरे यांचे तात्पुरत्या
स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावांतील 653
कुटुंबांतील 3 हजार 182 लोक व 2 हजार 727 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात
पुनर्वसन करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा