बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी व चारुभाई शहा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड रिसर्च ट्रस्ट यांच्याकडून १० लाखाची मदत

सांगली, दि. १४ (जि.मा.का.) : सांगली परिसरात कृष्णा नदीस आलेल्या प्रलयंकारी महापुरामुळे कृष्णा काठच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सांगलीमधील वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी लि. सांगली या संस्थेने ७ लाख रूपये ५० हजार रूपये व चारुभाई शहा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड रिसर्च ट्रस्ट, सांगली या संस्थेने २ लाख ५० हजार रूपये, असा एकूण १० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी सुपूर्द केला. यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ, औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे चेअरमन सचिन पाटील, व्हाईस चेअरमन अशोक चौगुले, डायरेक्टर रंगराव इरळे, बाजीराव ओतारी, उदय मिरजकर, सतीश पाटील, शैलेंद्र केळकर, उदय पाटील, शरद पाटील, विजय भगत, आण्णासाहेब कोरे, विनीत भिडे आदी सदस्य उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा