मंगळवार, १३ जानेवारी, २०२६
सांगली आकाशवाणीत नैमितिक उद्घोषकासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत
सांगली आकाशवाणीत नैमितिक उद्घोषकासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे नैमितिक उद्घोषक निवडण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 असल्याचे सांगली आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी तेजा दुर्वे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, आकाशवाणी सांगली कैद दैनंदिन प्रसारणासाठी उद्घोषकांचे पॅनल करू इच्छिते. लेखी परीक्षा, स्वर परीक्षा, मुलाखत या माध्यमातून समनुदेशिती अर्थात असायनींच्या पॅनेलमध्ये निवड झालेल्यांना नैमितिक उद्घोषक म्हणून काम करता येईल. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही नियमित नोकरीसाठी नाही हे लक्षात घ्यावे. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना प्रसारणाच्या आवश्यकतेनुसार फक्त आणि फक्त जेव्हा अशी आवश्यकता असेल तेव्हाच प्रसारण कार्यासाठी बोलवण्यात येईल.
उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०२५ रोजी २० ते ५० वर्षे असावे. उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर, प्रसारणयोग्य आवाज, उमेदवार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील राहणारा असावा अशी आवश्यक पात्रता आहे.
या प्रक्रियेला अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रुपये ३००/- + जीएसटी (१८ टक्के) म्हणजेच एकूण रु. ३५४/- एवढे शुल्क आकारले जाईल. अर्जाचा नमुना तसेच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणे यासाठीचे पेमेंट डिटेल्स विभाग खोली क्र. २५ आकाशवाणी केंद्र, सांगली, कोल्हापूर रोड, सांगली ४१६४१६ येथे २१ जानेवारी २०२६ पर्यंत सुट्टीचे दिवस तसेच शनिवार, रविवार वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. प्रक्रियेचा तपशील जाणून घेण्यासाठी संपर्काचा दूरध्वनी क्र. ०२३३-२३३२८८३असा आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा