मंगळवार, १३ जानेवारी, २०२६
धामणी रोड येथील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद
धामणी रोड येथील हसरा चौक रस्ता
17 ते 22 जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी धामणी रोड येथील हसरा चौक हा रस्ता दिनांक 17 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत अटी व शर्तीच्या अधिन राहून वाहतुकीस बंद करून सदर वाहतूक पर्यायी वाहतूक मार्गावरून वळविण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
पर्यायी वाहतूक मार्ग
(१) इनाम धामणीकडून सांगली शहरात येणाऱ्या वाहनांसाठी - इनाम धामणी- हॉरिझोन्टल हॉस्पिटल -डावीकडे वळून उषःकाल हॉस्पिटल - तक्षशिला रोड – १०० फुटी मार्गे शहरात जाता व येता येईल.
(2) इनाम धामणीकडून सांगली शहरात येणाऱ्या वाहनांसाठी - इनाम धामणी - जुना जकात नाका -वसंतराव शिंदे मार्ग - लिमये चौक- स्फूर्ती चौक - एम.एस.ई.बी. रोड मार्गे शहरात जाता व येता येईल.
(3) शांतीबन चौकाकडून इनाम धामणी रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - शांतीबन चौक १०० फुटी रोड - डी-मार्ट पुढे डावीकडे वळून तक्षशिला रोड- उषःकाल हॉस्पिटल - हॉरिझोन्टल हॉस्पिटल - उजवीकडे वळून धामणीकडे जाता व येता येईल.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा