गुरुवार, १ जानेवारी, २०२६

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 163 लागू

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सांगली, मिरज येथील एकूण 37 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 4 जानेवारी 2026 रोजीचे सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटा-गटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परीक्षा वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापर करण्यास मनाई केली असून परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा