रविवार, ८ नोव्हेंबर, २०२६

कर्जमुक्तीच्या चौथ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५५ कोटी ४८ लाखांचा लाभ

- ४ नोव्हेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती व राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत रक्कम वितरित सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ५५ कोटी ४८ लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४५ कोटी ३८ लाख, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत १० कोटी १० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. योजनेची चौथी यादी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८ हजार ३१८ आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे १६६ अशा एकूण ८ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या टप्प्यातील वितरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ हजार ३६७ आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या ९११ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. यापूर्वीच्या तीन याद्यांमधूनही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पहिल्या यादीतून १५६ कोटी ५४ लाख, दुसऱ्या यादीतून ६७ कोटी २५ लाख, तर तिसऱ्या यादीतून १५ कोटी ४६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे चारही टप्प्यांतील वितरणाचा विचार करता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण २९४ कोटी ७३ लाख रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ वितरित करण्यात आला आहे. या योजनेमुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा