सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : पर्जन्यवृष्टीमुळे कृष्णा नदीतील पाणीपातळीमध्ये वाढ
होत आहे. आज दुपारी १ वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोयना धरणामध्ये 94.94
टी.एम.सी. पाणीसाठा झालेला आहे. तसेच वारणा धरणात 33.20 टी.एम.सी. पाणीसाठा झालेला
असून कोयना धरणातून 65 हजार 53, वारणा धरणातून 20 हजार 472, कण्हेर धरणातून 16
हजार 820 व धोम धरणातून 4 हजार 500 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे
धरणाखालील सर्व भागात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढणार
असून कृष्णा नदीतील पाणीपातळीमध्ये वाढ होवून ती धोका पातळी पर्यंत पोहोचण्याची
शक्यता आहे.. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी
सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करून नये. वीज मोटारी, इंजिने, शेती
अवजारे व पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा