शनिवार, २५ जुलै, २०२६

कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र 37865 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

- पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र सभासद शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकेकडील एकूण 37 हजार 865 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील आपले सेवा केंद्र येथे जावून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. पात्र सभासद शेतकरी यांची यादी ग्रामपंचायत, गाव तलाठी कार्यालय, विकास सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँक यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तालुकानिहाय पात्र सभासद शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. शिराळा 1425, सांगली 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, विटा 1617, पलूस 2516, कडेगाव 1795, तासगाव 5496, जत 11 हजार 518. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा