सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

आय. एम. ए. मिरजतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : पूरग्रस्तांसाठी मदतीबरोबरच त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर संघटना पुढे सरसावल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन मिरजच्या वतीने मिरज हायस्कूल, दरगाह परिसर, शाळा क्र. 11 व 12 येथे तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्यासाठी आलेल्या पूरग्रस्तांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत एन. दोरकर आणि सचिव डॉ. राहुलसिंग के. चढ्ढा व सर्व सदस्यांनी केली. यावेळी खासदार संजय पाटील, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच, आरोग्य तपासणीनंतर पूरग्रस्तांना कपडे वाटप, अन्यधान्य वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. दिलीप टाकले, डॉ. अशोक कुलकर्णी डॉ. मंजुषा दोरकर, डॉ. अजय चौथाई व इतर सभासद उपस्थित होते.
00000











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा