सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

डाक विभागातर्फे पेन्शनधारकांसाठी दरमहा पेन्शन अदालत

सांगली, दि. 28 (जि. मा. का.): टपाल विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी आणि सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सांगली डाक विभागातर्फे आता दरमहा 'पेन्शन अदालत' आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. ही पेन्शन अदालत शक्यतो महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी घेतली जाईल. जर पहिल्या शुक्रवारी सुट्टी असेल, तर ती दुसऱ्या शुक्रवारी आयोजित केली जाईल. प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग यांचे कार्यालय, सांगली प्रधान डाकघर इमारत, राजवाडा चौक, सांगली येथे सकाळी 11 वाजता घेण्यात येईल. जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, अशा वेतन धारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे 3 महिन्याच्या आत निवारण झालेले नसेल तर, अशा प्रकरणांचा या पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यासह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन टीबीओपी/ एम.ए.सी.पी. पदोन्नती, वेतन श्रेणी वाढविणे, आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभांगाच्या आणि डीपीसी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकणांचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतन धारकांनी आपली तक्रार किंवा अर्ज विहीत नमुन्यात प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली प्रधान डाकघर इमारत, राजवाडा चौक, सांगली-416416 यांच्या नावे किमान 10 दिवस आधी पाठवावेत. तक्रारदारांनी आपली प्रकरणे वैयक्तिकरित्या सादर करावीत. मोठ्या प्रमाणात तक्रारी किंवा इतरांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा