सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

सारथीमार्फत मोफत प्रशिक्षण

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे मार्फत कृषी विज्ञान केंद्र तळसंदे, जि. कोल्हापूर यांच्या माध्यमातून व्यावसायिक दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 व फळ व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 5 ते 8 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सारथीच्या https://sarthi-maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन सारथी उपकेंद्र कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा