मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

जिल्हा प्रशासनातर्फे माहिती अधिकार दिन साजर

ा सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : शासन निर्णय दिनांक 20 सप्टेंबर 2008 नुसार 28 सप्टेंबर हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील विविध तरतुदी व त्याअनुषंगाने शासकीय कार्यालयांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून, शासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे. नागरिकांची कामे विहित मुदतीत पूर्ण करून शासकीय कर्तव्ये व जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असे आवाहन केले. सहाय्यक महसूल अधिकारी नीता कुकडे यांनीही माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील विविध तरतुदी, माहिती उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माहिती अधिकाराचा योग्य, नेमका आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी जनजागृती होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा