मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६
स्वाधार योजना लाभाच्या नूतनीकरणासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळालेल्या (Existing Student) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता योजनेच्या लाभाचे नूतनीकरण (Renewal) करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2026 पूर्वी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर नूतनीकरणाचा अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करूनही प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तसेच हद्दीपासून ५ किलोमीटर परिसरातील आणि तालुक्याच्या ठिकाणी (तालुका नगरपंचायत/नगरपरिषद हद्दीतील) असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनीकरिता राबविण्यात येत आहे. अर्जाच्या नूतनीकरणासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा