मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निधी वितरण सुरू
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या रु. 300 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. दि. 10 ऑगस्ट 2026 पासून या निधीच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे दिली आहे.
हा निधी महामंडळाच्या विविध योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार वितरीत करण्यात येणार आहे. या निधीमुळे स्वयंरोजगार, व्यवसाय, रोजगारनिर्मिती तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील पात्र लाभार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती, आवश्यक कागदपत्रे व निधी वितरणासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधावा. महामंडळाच्या अधिकृत माध्यमांवर उपलब्ध सूचनांनुसार लाभार्थ्यांनी पुढील कार्यवाही करावी, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा