बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना एनडीआरएफमार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
सांगली, दि. १२ (जि. मा. का.): आपत्कालिन परिस्थितीत तातडीने व प्रभावीपणे उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनडीआरएफ 5 बटालियन, पुणे यांचेकडील पथकामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी तहसीलदार (सर्वसाधारण) लीना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये आपत्कालिन परिस्थितीत एनडीआरएफ पथकाची भूमिका, आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक माहिती, प्रथमोपचार, सीपीआर उपचार पद्धती, तसेच घरातील उपलब्ध वस्तूंचा वापर करून फ्लोटिंग साहित्य तयार करण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या विविध उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.
एनडीआरएफचे निरीक्षक संजयकुमार मौर्या व त्यांच्या पथकातील जवानांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान विविध बाबींची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
आपत्तीच्या प्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे प्रतिसाद देऊन जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे, या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा