गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 13, (जि. मा. का.): राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिनांक 14 व 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता एसके इंटरनॅशनल सैनिक स्कूल, रेठरेधरण (एमएच), ता. वाळवा येथे आगमन व कॅडेट मेसच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.40 वाजता रेठरे धरण, ता. वाळवा येथून वाहनाने मिरज जि. सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, झारी बाग, मिरज, येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत निधीतून बांधलेल्या जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, सांगली यांचे नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वाजता हॉटेल ककुन, आमराई रोड, सांगली येथे आगमन व "लोकमत एक्सलन्स अॅवार्ड" सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वाजता वाहनाने जतकडे प्रयाण.
दुपारी 4 वाजता गट क्र. 19, शासकीय गोदामाजवळ, निगडी रोड, जत येथे आगमन व
1.) स्वयंचलित वाहन प्रशिक्षण केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जतच्या भूमिपुजन समारंभास उपस्थिती.
2.) उमराणी रोड, जत येथे नगरविकासच्या वैशिष्ट्यपुर्ण विशेष अनुदान योजना व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) नगरोत्थान निधी अंतर्गत नमो विद्यान विकसित करणे व ग्रंथालय बांधकाम करणे या कामांच्या भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती.
3.) जत सांगली रोड, जत येथील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे लोकार्पण.
4.) जत सांगली रोड, नगरपरिषद पाण्याची टाकीजवळ, जत येथील नगरविकासच्या वैशिष्ट्यपुर्ण विशेष अनुदान योजना अंतर्गत जत नगरपरिषद, जत च्या इमारत बांधकाम कामाच्या भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती.
सायंकाळी 6 वाजता जत येथून वाहनाने सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 7.15 वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील आयलँड लोकार्पण व ध्वजस्तंभ शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे आगमन व भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
0000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा