मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

आदिशक्ती पुरस्कारात येडेनिपाणी ग्रामपंचायत व्दितीय, कवठेपिरान तृतीय

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी व कवठेपिरान या दोन ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) सोमनाथ रसाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. यामध्ये येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत 10 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर कवळठेपिरान (ता. मिरज) ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक मिळवून 7 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले याशिवाय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 3 लाख आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास 1 लाख, द्वितीय क्रमांकास 50 हजार आणि तृतीय क्रमांकास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक कवठेपिरान, व्दितीय येडेनिपाणी तर तृतीय क्रमांक अंबक (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीस मिळाला आहे. तालुकानिहाय तालुकास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – राजेवाडी, पळसखेळ, निंबवडे. जत – रावळगुंडवाडी, बनाली, आसंगी जत. कडेगाव – अंबक, बेलवडे, चिंचणी वांगी. कवठेमहांकाळ – करलहट्टी, आगळगाव, धुळगाव. खानापूर (विटा) – गार्डी, वाझर, बामणी. मिरज – कवठेपिरान, सावळवाडी, बामणोली. पलूस – आमणापूर, भिलवडी, आंधळी. शिराळा – शिरशी, करमाळे, मांगरूळ. तासगाव – हातनूर, बलगवडे, गव्हाण. वाळवा – येडेनिपाणी, पेठ, महादेववाडी. आदिशक्ती पुरस्कारांतर्गत सांगली जिल्ह्याला एकूण 38 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त होणार असल्याचे प्रसिध्दीपप्कात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा