गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात २०७ मतदान केंद्रे प्रस्तावित
- पदवीधर मतदारसंघात ८७ हजार ५९८ मतदार
- शिक्षक मतदारसंघात ८ हजार २५ मतदार
सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर 700 मतदार या प्रमाणात पदवीधर मतदारसंघासाठी 159 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 48, अशी सांगली जिल्ह्यात एकूण 207 मतदान केंद्रे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच 4 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघात एकूण 87 हजार 598 मतदार आणि शिक्षक मतदारसंघात 8 हजार 25 मतदार संख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र संख्या पुढीलप्रमाणे - मिरज १०, सांगली १४, इस्लामपूर २६, शिराळा २२, पलूस-कडेगाव ४५, खानापूर १९, तासगाव-कवठेमहांकाळ १६ आणि जत येथे ७ मतदान केंद्रे अशी एकूण 159 मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र संख्या पुढीलप्रमाणे - मिरज ५, सांगली ४, इस्लामपूर ५, शिराळा ८, पलूस-कडेगाव ५, खानापूर ८, तासगाव-कवठेमहांकाळ ७ आणि जत ६, अशी एकूण ४८ मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत.
मतदारसंख्या
शिक्षक मतदारसंघात जिल्ह्यात एकूण 8 हजार 25 मतदार आहेत. यामध्ये 5 हजार 124 पुरुष आणि 2 हजार 901 महिला मतदारांचा समावेश आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय शिक्षक एकूण मतदारसंख्या पुढीलप्रमाणे - मिरज ७७८, सांगली १,३४४, इस्लामपूर १,१३९, शिराळा ७९९, पलूस-कडेगाव ९४९, खानापूर १,०२२, तासगाव-कवठेमहांकाळ १,००३ आणि जत ९९१ अशी आहे.
पदवीधर मतदारसंघात जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ८७ हजार ५९८ आहे. विधानसभा मतदार संघनिहाय पदवीधर मतदारसंख्या पुढीलप्रमाणे - मिरज ५,२८३, सांगली ७,५३४, इस्लामपूर १५,१४५, शिराळा १०,६६७, पलूस-कडेगाव २५,७१३, खानापूर ११,२०९, तासगाव-कवठेमहांकाळ ९,३२० आणि जत २,७२७ मतदारांचा समावेश आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा