शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

समाज कल्याण कार्यालयाकडून घरकुल लाभार्थीस सदिच्छा भेट

सांगली, दि. 9 (जि. मा. का) : 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत सांगली जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत तासगाव तालुक्यातील कांबळेवाडी येथील 'रमाई घरकुल योजने'च्या लाभार्थी वनिता कांबळे यांच्या नवनिर्मित घरकुलास विशेष सदिच्छा भेट देण्यात आली व घराची पाहणी करण्यात आली. तसेच, नवीन घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी, यासाठी 'आशीर्वादाचा दिवा' लावण्यात आला. समतादूत सविता पाटील यांनी 'सेवा संकल्प कार्यक्रमाचा' मुख्य उद्देश विषद केला. शासनाचे कल्याणकारी विचार, योजना आणि सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवणे, तसेच लाभार्थीच्या जीवनात आर्थिक व सामाजिक स्थैर्य आणून त्यांचा जीवनस्तर उंचावणे हा या अभियानाचा मूळ हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा