शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक जिल्हास्तरीय पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

सांगली, दि. 9 (जि. मा. का) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी मतदार यादी, मतदान केंद्र संख्या, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान केंद्रावर पुरवावयाच्या किमान आवश्यक सुविधा, मनुष्यबळाचे नियोजन, मतदान पेटी व्यवस्थापन, निवडणूक साहित्य व्यवस्थापन, मतपत्रिका व्यवस्थापन, आचारसंहिता कक्ष कामकाज, तक्रार निवारण प्रणाली, स्वीपअंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना, मतदान, मतमोजणी पथके आदींचे प्रशिक्षण, टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राद्वारे (ईडीसी) मतदानाची व्यवस्था, संगणकीकरण व्यवस्थापन, मतदान केंद्रावरील साहित्य पोहोच करणे, मतदान प्रक्रिया, मतमोजणी नमुने आदिंविषयी आढावा घेण्यात आला. मतदानाची पद्धती वेगळी असल्याने त्याबाबत मतदारांत प्रबोधन करावे. मतदान टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक स्वीप उपक्रमाद्वारे जनजागृती करावी. त्यासाठी विविध माध्यमातून छोट्या- छोट्या ध्वनीचित्रफीती मतदारांपर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा