शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६
मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले यांचा बुधवारी सांगली जिल्हा द्वितीय दौरा
सांगली, दि. 9 (जि. मा. का) : मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) 2026 च्या अनुषंगाने दावे व हरकतींच्या कालावधीत कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली - उगले या बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारच्या सत्रात सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे – दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3.30 ते 3.45 वा. जिल्ह्यातील सर्व ईआरओ/एईआरओ यांची आढावा बैठक स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, दुपारी 4 ते 4.30 283-ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 163 (कृष्णानगर) व क्र. 199, 200 (मिरजवाडी) येथे भेट – बीएलओ व मतदारांशी चर्चा. सायं. 4.45 ते 5.15 - ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 88 (उरूण ईश्वरपूर) येथे भेट – बीएलओ व मतदारांशी चर्चा. सायं. 5.30 ते 5.45 – 284- शिराळा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 81 व 82 (माणिकवाडी) येथे भेट– बीएलओ व मतदारांशी चर्चा. सायं. 6 ते 6.15 – 284-शिराळा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 30 (वाटेगाव) येथे भेट– बीएलओ व मतदारांशी चर्चा. सायं.6.30 सांगलीकडे प्रयाण व मुक्काम.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांकरिता विभागीय आयुक्त हे मतदार यादी निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. मतदार यादी निरीक्षक यांचा प्रथम जिल्हा दौरा दि. 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत पूर्ण झाला आहे. मतदार यादी दावे व हरकतींचा निपटारा सुरू असलेल्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक यांची दुसरी भेट होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा