शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरजेतील दोन महाविद्यालयांत करिअर समुपदेशन

सांगली, दि. 9 (जि. मा. का) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने कन्या महाविद्यालय, मिरज आणि मिरज महाविद्यालय मिरज येथे सरकारी योजनांची जागरुकता व करिअर समुपदेशन करण्यात आले. दोन्ही महाविद्यालयात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत येणा-या योजनांची माहिती सांगून करिअर समुपदेशनबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे सुरु असलेल्या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका व मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कन्या महाविद्यालय, मिरज येथील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास माळकर, तर मिरज महाविद्यालय मिरज येथील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जिल्हा समन्वयक धनश्री जगताप, दया उगले आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींचा प्रतिसाद लाभला. यावेळी करिअर व रोजगाराच्या संधींबाबत शंका निरसन करण्यात आले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा