शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सांगली यांच्या न्यायासनाकडे दाखल अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सांगली कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ब्लॉक नं 101 विजयनगर, सांगली येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठीया यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा