गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, सहायक जिल्हा सरकारी वकील ॲड. दिपक कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा, नुकसान भरपाई तसेच पीडितांच्या वारसांचे पुनर्वसन, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी आदिंचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नुकसान भरपाईची 25 प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच तीन प्रकरणांमध्ये वारसांना पेंशन मंजूर करण्यात आली. तसेच प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा समितीसमोर दिला. पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी यांचा आढावा घेण्यात आला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा