गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गिरीजेश ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 खालील प्रकरणे, जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बॅंक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा