गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त मौजे विठलापूर, दिघंची, पळसखेल व आवळाई या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विटा डॉ. विक्रम बांदल, आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन महसूल व कृषी विभागातील संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळवून दिली जाईल. शेतकऱ्यांनी धैर्याने या संकटाचा सामना करावा, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी दिला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा