मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५
वारणा धरणात 33.74 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 33.74 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.41 (105.25), धोम 13.48 (13.50), कन्हेर 10.08 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.92 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 33.74 (34.40), राधानगरी 8.10 (8.36), दूधगंगा 21.29 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.65 (2.77), पाटगांव 3.68 (3.72), अलमट्टी 122.83 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सायंकाळी 5 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 2100, धोम 489, कण्हेर 590, धोम बलकवडी 330, उरमोडी 450, वारणा 1630, राधानगरी 300, दुधगंगा 700, तुळशी 100, कासारी 300, पाटगाव 350, हिप्परगी बॅरेज 35 हजार 878 व अलमट्टी धरणातून 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12.3 (40) व अंकली पूल हरिपूर 10.3 (45.11).
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा