मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

महानगरपालिका आयुक्त यांचा 24 सप्टेंबरला मनपा हद्दीतील माजी सैनिकांशी संवाद मेळावा

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीतील माजी सैनिकांचा सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संवाद मेळावा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता आयोजित केला आहे. हा मेळावा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने आयुक्त यांच्याकडून माजी सैनिकांच्या, वीर पत्नी तसेच वीर माता व पिता यांच्या महानगरपालिका संबंधित अडीअडचणीबाबत मार्गदर्शन तसेच निराकरण करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा