गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

जातीचे दाखले तयार करण्यासाठी आयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या - तहसिलदार अश्विनी वरूटे

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यभर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत "सेवा पंधरवडा" राबविण्यात येत आहे. दिनांक 19 संप्टेंबर 2025 रोजी विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विमुक्त भटक्या जाती जमातीच्या नागरिकांना जातीचे दाखले तयार करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन माधवनगर गोसावी गल्ली कुपवाड व वडर कॉलनी सांगली येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये गोसावी, वडर, माकडवाले, कुंची-कोरवी, गारुडी इत्यादी जातीच्या लोकांना शासकीय फी मध्ये जातीचा दाखला तयार करुन दिला जाईल. या शिबीराचा जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा