सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलींसाठी 50 विद्यार्थी क्षमतेचे एक अशी दोन वसतिगृहे शासनाकडून सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया दि.19 ते दि.29 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सुरु असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश मिळण्याकरिता https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. त्या अर्जाची प्रत व त्याअनुषंगीक सर्व कागदपत्रे (सहाय्यक संचायक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुना बुधगांव रोड,सांगली) या कार्यालयास दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावीत. अधिक माहितीसाठी मुलांचे वसतिगृहासाठी अधिक्षक मोबा. क्र. 9763491019 व मुलींच्या वसतिगृहासाठी अधिक्षिका मोबा. क्र. 8766954163 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा