मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

कोल्हापूर येथे 27 सप्टेंबरला माजी सैनिक मेळावा

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : माजी सैनिक, वीर नारी आणि वीर मातासाठी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राच्या वतीने दि 109 इन्फट्री बटालियन (टी ए) मराठा लाइट इन्फट्री प्रशिक्षण क्षेत्र कोल्हापूर येथे दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने पी. सी. डी. ए. (पेन्शन) प्रयागराज, वैद्यकीय शिबिर तसेच पेन्शनबाबत मार्गदर्शन होणार आहे. सर्व रेजिमेंट, कोरमधील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा